Nitesh Rane : ठाकरेंचा हुकूम आला अन् 'वैभव'शाली नेत्याची पक्षातून हकालपट्टी, निर्णय होताच नितेश राणेंनीही डाव साधला

Uddhav Thackeray removes Mangesh Loke’s removal from Shivsena UBT : शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांना तळकोकणात सिंधुदुर्गात मोठा झटका बसला होता. आमदारकी लढलेल्या राजन तेली त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
Nitesh Rane Uddhav Thackeray
Nitesh Rane Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. ठाकरे गटाचे आदेशानुसार वैभववाडी तालुकाप्रमुख माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे.

  2. शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी या निर्णयाची अधिकृत माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

  3. याच पार्श्वभूमीवर लोके यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असून नितेश राणेंनी ठाकरेंच्या निर्णयावर डाव साधल्याची चर्चा रंगली आहे.

Sindhudurg News : तळकोकणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा मोठं खिंडार पडले आहे. येथे सावंतवाडी मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा लढलेले राजन तेली यांनी पक्षाला रामराम ठोकत दसरा मेळाव्यातच भगवा हाती घेतला. यामुळे आगामी स्थानिकच्या आधी शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढल्याची चर्चा सुरू आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरेंच्या एका निर्णयावर डाव साधल्याचेही समोर येत आहे. यामुळे जिल्ह्यात शिवसेना आता औषधाला तरी शिल्लक राहणार का असा सवाल येथे उपस्थित केला जातोय.

तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वैभववाडी तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. माजी पंचायत समिती सदस्य असणाऱ्या लोके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.

ठाकरे यांच्या आदेशानुसार वैभववाडी तालुकाप्रमुख पदी नंदू शिंदे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे सचिव, माजी खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. एकीकडे असे हाकालपट्टीने आदेश निघतानाच लोके यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या निर्णयावर नितेश राणेंनी डाव साधल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Nitesh Rane Uddhav Thackeray
Nitesh Rane allegations : 'बाळासाहेब ठाकरेंचे ठसे घ्यायला स्वित्झर्लंडवरून कोण येणार होते..." नितेश राणेंच्या आरोपांना ठाकरेंच्या वाघाचं एकाच शब्दात प्रत्युत्तर

लोके यांचा शनिवारी (ता.4) कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे. लोके हे पंचायत समितीचे सदस्य राहिले असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडाल पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे राजन तेली यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने सावंतवडीत शिवसेना मजबूत स्थितीत गेल्याचे बोलले जात होते. तसेच तेली हे खासदार नारायण राणे यांचे कट्टरविरोधक मानले जात असल्याने तेली यांच्या प्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झाले होते.

अशातच भाजपचे नेते नितेश राणे यांनी योग्य वेळी योग्य डाव साधत लोके यांचा भाजप प्रवेशाकडे लक्ष घातले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे. तसेच आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपच्या गळाला मोठा मासा देखील लागल्याचे बोलले जात आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे हे पक्षप्रवेश महायुतीसाठी महत्त्वाचे ठरणार असून निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरेंचा शिवसेनेला मोठे धक्के देणारे असल्याची चर्चा आहे.

Nitesh Rane Uddhav Thackeray
Nitesh Rane RSS : पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट अन् डोक्यावर काळी टोपी... नितेश राणे पहिल्यांदा RSS गणवेशात

FAQs :

प्र.१: मंगेश लोके यांच्यावर काय कारवाई करण्यात आली आहे?
उ: उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांना शिवसेनेतून हाकालण्यात आले आहे.

प्र.२: या निर्णयाची माहिती कोणी दिली?
उ: शिवसेनेचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.

प्र.३: मंगेश लोके आता कोणत्या पक्षात जाणार आहेत?
उ: ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्र.४: या घडामोडीत नितेश राणेंचा काय संबंध आहे?
उ: राजकीय वर्तुळात नितेश राणेंनी ठाकरेंच्या निर्णयावर डाव साधल्याची चर्चा आहे.

प्र.५: या प्रकरणाचा वैभववाडीतील राजकारणावर काय परिणाम होईल?
उ: या घडामोडीनंतर भाजपला स्थानिक स्तरावर बळकटी मिळेल आणि ठाकरे गटात असंतोष वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com