Uddhav Thackeray, Narayan Rane

 
sarkarnama
कोकण

शिवसेना आहे की चिवसेना? राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

नारायण राणे (Narayan Rane) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (UddhavThackeray) जोरदार टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भाजप (BJP) नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

''महाराष्ट्राला आजारी मुख्यमंत्री लाभले आहेत. राज्याला नामदारी मुख्यमंत्री नको. त्यांनी राज्याला 10 वर्ष मागे नेले आहे,'' अशा शब्दात राणेंनी ठाकरेंवर टीका केली आहे. ते कुडाळ नगरपंचायत निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.

राणे म्हणाले, ''कुडाळच्या जनतेला सुखाने, आनंदाने जगण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. विरोधकांनी गेल्या अडीच वर्षांत एक तरी चांगले काम केले असेल तर, सांगा. विरोधक विकासावर बोलत नाही. ते राणे आणि आमच्या कुटुंबियांवर टीका करतात. मला मत मागायचा अधिकार आहे. कारण की, कुडाळ मधील आमच्या नगराध्यक्षाने व नगरसेवकांनी चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील 400 शिक्षक, मेडीकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज मी आणले. तुम्ही एक तरी बालवाडी काढली का?'' असा सवाल करत, शिवसेनेवर जोरदार टीका केली.

''चिपी विमानतळाचे भूमिपूजन मी आणि सुरेश प्रभूंनी केले. याविरोधात शिवसेनेने त्यावेळी आंदोलन केले. 2014 साली विमानतळ बांधून पूर्ण केले. मात्र, सुरू करायला किती वर्षे गेली बघा. योगायोग म्हणा किंवा काही मी केंद्रात मंत्री झाल्यावर चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख खासदार विनायक राऊतांनी 7 जाहीर केली. मी हवाई मंत्री जोतीरादित्य शिंदे यांना भेटून ती 9 ऑक्टोबरला जाहीर केली. विमानतळ सुरू केले त्यावेळी राऊत हे विमानात पेढे वाटत होते. उद्धव ठाकरे बार भरून उभे होते. मला पाहून म्हणाले आज भांड फोडणार का असे विचारले? मी म्हटले स्टेजवर फोडणार. मी भाषण सुरू केले. हे विमानतळ सुरू कोणी केले ते स्टेजवर जाहीर सांगितले. हे विमानतळ नको म्हणून राऊत आंदोलन करत होते, त्यावेळी त्यांची बेईज्जती काढली बसलो,'' असे राणे म्हणाले.

राणे म्हणाले, ''या सरकारने मोठे प्रोजेक्ट रद्द केले. माझे आयुष्य जेवढं आहे तेवढं जगणार आहे. आम्हाला धमक्या देऊ नका. धमक्या द्यायला रग लागते. माझे काहीच विरोधक करू शकत नाहीत. आताची शिवसेना आहे का चिवसेना आहे? असा टोला देखील त्यांनी लगावला. चिपी विमानतळावरून कुडाळला येताना गाडीत बसलो की होडीत बसलो समजत नाही. मुंबईतुन विमानाने येताना न हलत येतो. मात्र, पुढे जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाले. मला व्हॅल्यू ऍडेड प्रोजेक्ट पाहिजेत. म्हणून पदभार स्वीकारला आणि लगेच काम सुरू केले आहे. मला उद्योगमय सिंधुदुर्ग जिल्हा करायचा असल्याचे सांगत जिल्ह्यातील लोकांनी व्यवसाय करावा असे मत राणेंनी व्यक्त केले.

रेडी पोर्टमध्ये राऊतांचा मुलगा हप्तेखोरीसाठी उभा असतो

''रेडी पोर्टमध्ये राऊतांचा मुलगा महिन्याच्या सुरूवातीला हप्तेखोरीसाठी उभा असतो. आम्हाला मताची भीक मागायची गरज नाही, आम्ही मताचा मोबदलला मागू. आम्हाला सेवा करायची, विकास करायची आहे म्हणून आम्हाला सत्ता द्या. मोदींनी केलेली काम लोकांपर्यंत घेऊन जा, मतदारांसमोर विनम्र व्हा, मत मागा लोक मत देतील. कुडाळ मध्ये 13 पैकी 13 नगरसेवक निवडणून आले पाहिजेत, असे राणे म्हणाले. तसेच, विरोधकांच्या चेहऱ्यावर जेवढे खड्डे आहेत, तेवढे जिल्ह्यातील रस्त्यावर खड्डे आहेत. मुख्यमंत्री आजारी असून घरीच आहेत. राज्याला मुख्यमंत्री हवा तसा मिळाला नाही. हा नामदारी मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राला यांनी 10 वर्ष मागे नेले,'' अशी जळजळीत टीका राणेंनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT