महाड राड्या प्रकरणात विकास गोगावलेला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणामुळे मंत्री भरत गोगावले यांच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपकडून महाड मतदारसंघावर दावा करण्याच्या चर्चांना प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यामुळे वेग आला आहे.
Raigad News : महाड राड्या प्रकरणात शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले अडचणीत आले असून मुलगा विकास गोगावले याला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे आता गोगावलेंच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच गोगावले यांच्या महाड मतदार संघावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राजकारणात उद्या काहीही होऊ शकतं, आम्ही आता एकेक पाऊल टाकतोय. आमचा पक्ष गल्ली ते दिल्ली गाठलेली आहे असे म्हणत महाडबाबत संकेत दिले आहेत. या संकेतांमुळेच आता भविष्यात भाजप या मतदार संघावर दावा करु शकतो, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
यावेळी दरेकर यांनी, आमचा पक्ष हा ग्रामपंचायत ते पार्लमेंटमध्ये जाणारा पक्ष असल्याने भविष्यात काहीही होऊ शकतं. राजकारणातही काहीही घडू शकतं. आता आम्ही एकेक पाऊल टाकत असून आमचा पक्ष मोठी वाटचाल करत असल्याचे दरेकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या सूचक वक्तव्यानंतर आता रायगगडच्या राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे. तर भाजपचा डोळा मंत्री भरत गोगावले यांच्या महाड मतदार संघावर असल्याचेही बोलले जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावर ते सुमारे अडीच तास आडकले होते. मुंबई गोवा महामार्गावरील रायगडमधील इंदापुर येथे वाहतूक कोंडीचा दरेकर यांना सामना करावा लागला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री यांना SMS केल्याच सांगत नितीन गडकरी यांच्या सोबत बोलणार असल्याचे सांगत महामार्गावर होणार्या वाहतूक कोंडीचा अनुभव आल्याचे सांगत. सर्वसामान्यांना जो त्रास होतो याची प्रांजळ कबुली दरेकर यांनी या वेळी दिली आहे.
महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात मुबई उच्च न्यायालायने राज्य सरकारचे कान टोचत थेट राज्याचे मुख्यमंत्र्यांनाच असाह्य म्हटले होते. तर मंत्री भरत गोगावले यांना सुनावत मुलाला पुढच्या 24 तासात पोलिसांना शरण जाण्यास सांगा असे निर्देश दिले होते. ज्यानंतर विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेचे आठ संशयित आरोपी पोलिसांना शरण गेले.
त्यानंतर पाच तासांच्या अंतराने राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत जगताप यांसह एकूण पाच संशयित आरोपीही पोलीस ठाण्यात हजर झाले होते. या प्रकरणात एकीकडे विकास गोगावले यांना जामीन मिळेल अशी चर्चाल सुरू असतानाच त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठली सुनावली.
या आदेशानंतर आता गोगावले यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात होते. याबाबत दबक्या आवाजत चर्चा सुरू होत्या. तोच आता भाजपने आपला मोर्चा गोगावले यांच्या मतदार संघाकडे वळवल्याचे दिसत आहे. तर मतदार संघावर डोळा ठेवत भविष्यात काहीही होऊ सकते असेही भाकीत प्रविण दरेकर यांनी केलं आहे. यामुळे गोगावले यांच्या राजकीय अडचणी वाढतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
FAQs :
1) महाड राड्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
👉 महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणात अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले असून विकास गोगावलेला पोलिस कोठडी सुनावली आहे.
2) विकास गोगावलेला किती दिवसांची पोलिस कोठडी मिळाली?
👉 न्यायालयाने विकास गोगावलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
3) भरत गोगावले यांच्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो?
👉 या प्रकरणामुळे त्यांची राजकीय प्रतिमा आणि महाड मतदारसंघातील स्थिती प्रभावित होऊ शकते.
4) भाजप महाड मतदारसंघावर दावा करणार का?
👉 भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यामुळे भविष्यात भाजप दावा करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
5) महाड मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी बदलू शकतात?
👉 शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.