भाजप आमदार नीतेश राणे नेहमीप्रमाणे पुन्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकेचा प्रहार केला आहे. जी ताकद उद्धव ठाकरेंनी त्यांचा मेहुणा श्रीधर पाटणकर यांना वाचवायला लावली तीच ताकद राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांना वाचवायला का लावली नाही, असा सवाल नीतेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
सूरज चव्हाण यांनी कुणाच्या सांगण्यावरून खिचडी घोटाळा केला? सुजित पाटकर, सूरज चव्हाण ही कुणाची माणसं आहेत? आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आणखी किती जणांचे बळी घेणार आहेत? असे अनेक प्रश्न नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केले आहेत.
श्रीधर पाटणकरांना वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिल्ली गाठली होती. त्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता सोडण्यासही उद्धव ठाकरे तयार होते, असा आरोप नीतेश राणेंनी केला आहे. मग ती ताकद सूरज चव्हाण आणि साळवींसाठी का वापरत नाही, असा थेट सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी अजून गायब आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याने मोठ्या कंपन्या स्थापन केल्या आणि तो गायब आहे. त्याच्याबरोबर श्रीधर पाटणकर यांचे व्यवहार दिसले होते ते पाटणकर आरामात फिरत आहेत, याकडे नीतेश राणेंनी लक्ष वेधले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यावरून दिल्लीत जाऊन काँग्रेसची चाटूगिरी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असा पलटवार नीतेश राणे यांनी केला. शिवाय 15 दिवसांत राऊत कुटुंबातील सदस्य तुरुंगात असतील, असे भाकीतही केले.
कुणामध्ये किती हिंमत आहे, हे 2024 च्या निवडणुकीत स्पष्ट होईल, असा दावा भाजप (BJP) आमदार नीतेश राणे यांनी केला. त्याचवेळी उद्धव ठाकरेंना परदेशात जायला गुजराती बिल्डरचा पैसा चालतो अन्य गोष्टीत गुजराती का चालत नाहीत, असा सवालही केला. सत्तेत असताना उद्धव ठाकरे, संजय राऊत स्वतःच्या मुलांचा विचार करतात आणि सत्ता गेल्यावर बेरोजगारीवर बोलतात, याचाही नीतेश राणे यांनी समाचार घेतला.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.