Solapur News : सोलापुरातील रे-नगर येथील कामगारांच्या घरांच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड भावूक झाले. रे-नगर येथील घरे जेव्हा मी पाहिली, त्यावेळी वाटलं की, आपल्यालाही लहानपणी राहायला असे घर मिळाले असते तर... हे वाक्य उच्चारताच मोदी प्रचंड भावूक झाले. त्यांचा गळा दाटून आला... त्यांना गहिवरून आले... पुढे शब्दही फुटेना... लहानपणीचे दुःख आठवून मोदी दोन मिनिटे बोलू शकले नाहीत. एवढे मोदी भावूक झाले होते. पुढची काही मिनिटे ते कातर स्वरातच बोलत होते. (Narendra Modi emotional while speaking at a program in Solapur)
सोलापूर येथील कुंभारीच्या रे-नगर येथे असंघटित कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात पंधरा हजार घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पाच कामगारांना मोदी यांच्या हस्ते त्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रकल्पाचे संकल्पक नरसय्या आडममास्तर व्यासपीठावर उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोदी म्हणाले की, महाराष्ट्राचा गौरव माझ्यामुळे वाढत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हे ऐकायला चांगलं वाटतं. राजकारण्यांना तर ते अधिक चांगलं वाटतं. पण, श्रीमान शिंदेजी... महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टामुळे आणि प्रगतिशील सरकारमुळे महाराष्ट्राचे नाव देशात उंचावत आहे. कामगारांसाठी आम्ही जो संकल्प केला होता, तो आज पूर्ण होत आहे.
पीएम आवास योजनेतील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे आज लोकार्पण होत आहे. मी जेव्हा ही घरे पाहून आलो, त्यावेळी वाटलं की, आपल्यालाही लहानपणी असे घर मिळाले असते तर... हे वाक्य उच्चारताच मोदी प्रचंड भावूक झाले. त्यांचा गळा दाटून आला... मोदी यांना पुढे शब्दच फुटेना... मोदी दोन घोट पाणी प्यायले. लहानपणीचे दुःख आठवून मोदी दोन मिनिटे बोलू शकले नाहीत. एवढे मोदी भावूक झाले होते. पुढे कातर स्वरातच मोदी हे काही वेळ बोलत होते.
ही घरे जेव्हा मी पाहतो, त्यावेळी मनाला प्रचंड आनंद वाटतो. हजारो कुटुंबांचे स्वप्न साकार होत आहे, या कामगारांचे आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी पुंजी आहे. मी जेव्हा या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. त्याचवेळी घरांची चावी देण्यासाठी मीच येईन, अशी गॅरंटी दिली होती. मोदींनी ती गॅरंटी पूर्ण केली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.