Uddhav Thackeray, Nitesh Rane News Sarkarnama
कोकण

MLA Nitesh Rane News : नितेश राणेंनी इर्शाळवाडीतही उद्धव ठाकरेंना गाठले!

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray's visit to Irshalwadi News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दहा-बारा तास ईशाळवाडीत तळ ठोकला, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, आदिती तटकरे, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही पावसात, चिखलात राहिले. त्यापाठोपाठ शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) ईशाळवाडीच्या शिवेवर जाऊन लोकांना धीर दिला. मात्र, ठाकरेंवर बोलण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) ईशाळवाडीतही उद्धव ठाकरेंना गाठले आणि दौऱ्याच्या उद्देशावरच चिखलफेक केली.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यामध्ये आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज (ता. 22 जुलै) उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी येथे भेट दिली. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर नितेश राणे यांनी जोरदार टिका केली. नितेश राणे म्हणाले, ''हे स्वत: मुख्यमंत्री असताना कोकणामध्ये वादळ येवून गेली. तेव्हा कोकणाला (Konkan) काय मतद केली. याचा पहिला हिशोब उद्धव ठाकरे यांनी दिला पाहिजे.''

''आम्ही प्रत्येक वेळी कोकणासाठी मदत मागितली. त्यांच्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात कोकणासाठी मागणी करुनही एक दमडी मिळाली नाही. उगाचेच फोटो काढण्यासाठी तुम्ही जात असाल तर याला काही अर्थ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मंत्री गिरीश महाजन हे सर्व मतद करत आहेत.''

''हिंदी चित्रपटामध्ये असते ना की सगळी चोरी झाल्यानंतर पोलीस पोहचतात, तसेच उद्धव ठाकरे पोहचताहेत. चित्रपट संपायला आला सगळे काही चोर पकडले गेले. हे आले आता वर्दी घालून ते दाखवण्यासाठी अशी त्यांची गत आहे,'' अशा तिखट शब्दांत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

यावेळी नितेश राणे यांनी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावरही टिका केली. ''विनायक राऊत हे कोकण निर्मीत संकट झाले आहेत. आता ते संकट आमच्या कोकणाने 2024 मध्ये दुर करावे, अशी कळकळीची विनंती मी जनतेला करतो,'' असेही राणे म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT