Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली असली तरी इर्शाळवाडी घटनेची माहितीही मोदींनी जाणून घेतली. घटनेचे गांभीर्य मुख्यमंत्री शिंदेंच्या तोंडून ऐकताच मोदी हळहळले आणि घटनेतून सावरण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला सगळ्या पातळ्यांवर हव्या त्या मदतीचा शब्दही मोदींनी दिला.
मुख्यमंत्री शिंदेंनी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची कुटुंबासह भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण ही भेट सदिच्छा भेट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या भेटीदरम्यान मोदींनी राज्यातील अनेक विषयासंदर्भात माहिती घेतली. याबरोबरच रायगडमधील इर्शाळवाडीत घडलेल्या दरड कोसळल्याच्या दुर्घटनेसंदर्भात मोदींनी सविस्तर माहिती जाणून घेत आपल्या घटनेविषयी संवेदना व्यक्त केल्या.
इर्शाळवाडीत दुर्घटनेत आत्तापर्यंत २४ लोकांचा मृत्यू झाला असून अजूनही काही लोकं बेपत्ता आहेत. प्रशासनाकडून अद्यापही बचाव कार्य सुरू आहे. ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: एक दिवस तळ ठोकून योग्य त्या सूचना प्रशासनाला देत होते. यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली. पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्र्यांनी इर्शाळवाडीच्या दुर्घटनेसंदर्भात माहिती दिली.
यावेळी मोदींनी इर्शाळवाडी दुर्घटनेबद्दल तसेच राज्यात सुरू असललेले प्रकल्प, राज्यातील सध्याची परिस्थिती, पावसाची परिस्थिती जाणून घेतली. इर्शाळवाडीची घटना कशी घडली, यामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला, किती लोकांना वाचवण्यात यश आले, सध्या इर्शाळवाडीत काय परिस्थिती आहे, येथील नागरिकांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार काय पावलं उचणार?, असे अनेक प्रश्न विचारत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी घटनेचे गांभीर्य मुख्यमंत्री शिंदेंच्या तोंडून ऐकताच मोदी हळहळले. तसेच आवश्यक त्या सर्व मदतीचा मोदींनी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.