Nitesh Rane, CM Devendra Fadnavis and Jain Muni Nileshchandra sarkarnama
कोकण

Nitesh Rane : 'छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना अमान्य', कौतुक करणाऱ्या जैन मुनींना राणेंनी फटकारलं; CM पदाबाबतही बोलले, म्हणाले, 'मुख्यमंत्री'

Nitesh Rane On Jain Muni Nileshchandra And CM Devendra Fadnavis : जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणींबद्दल केलेल्या एका दाव्यावरून वाद पेटला होता. यावर जैन मुनी निलेशचंद्र यांनी भाष्य करत या वादावर पडदा टाकला होता. मात्र आता आता तेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Aslam Shanedivan

  1. जैन मुनी निलेशचंद्र यांनी नितेश राणेंची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने वाद निर्माण झाला.

  2. नितेश राणेंनी ही तुलना अमान्य करत नाराजी व्यक्त केली.

  3. त्यांनी देवेंद्र फडणवीस हेच पुढील 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील असेही स्पष्ट केले.

Sindhudurg News : वादग्रस्त आणि कट्टर हिंदुत्त्वावादी भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले मंत्री नितेश राणे यांनी जैन मुनी निलेशचंद्र यांच्यावर थेट नराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री लाभले असून पुढचे 25 वर्ष देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असेही म्हटले आहे. मुनी निलेशचंद्र यांनी नितेश राणे यांचे तोंडभरुन कौतुक करत ते मंत्रीच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखीच असल्याचे म्हटले होते.

ज्यानंतर राज्यात नव्य वादाला तोंड फुटले होते. या वादानंतर आता आपली ठाम भूमिका मांडली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. ते आम्हाला मान्य नाही, असे म्हणत जैन मुनी निलेशचंद्र यांना फटकारले आहे. तर त्या सभेनंतर तेथेच आपण नाराजगी व्यक्त केल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

निलेशचंद्र मुनी यांनी नितेश राणे यांची थेट शिवरायांसोबत तुलना केली होती. त्यांनी, छत्रपती शिवाजी महारांजइतकीच नितेश राणेंची उंची असल्याचे म्हटले. तसेच जशी बाळासाहेब ठाकरेंची ठाम भूमिका घेतली. तेही तशीच घेत असतात. यामुळे आपण स्वप्न पाहणाऱ्यांना सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराज नितेश राणे यांच्यांत आहेत. नितेश राणे यांची उंचीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यांसारखीच आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्याशी ईर्षा करू नका, कायद्यात राहालं तर फायद्यात राहाल, असे म्हटले होते.Devendra Fadnavis

त्याबरोबर त्यांनी फक्त मंत्रीच नाही तर मुख्यमंत्री झाले पाहिजेत असेही निलेशचंद्र मुनी यांनी भावना व्यक्त केली होती. तर जेव्हा मालवणीमध्ये, मालेगावमध्ये जेव्हा वाद निर्माण झाला, जातीय तेढ निर्माण झाला. तेव्हा तेथे कोणं नाही, नितेश राणे आले. त्यामुळे नितेश राणे यांचे आधी अभिनंदन कराला हवं, असे म्हणत नितेश राणे यांचे तोंडभरुन कौतुक केले होते. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. तर नितेश राणे यांनी आपली भूमिका मांडत यावर नाराजी व्यक्त केलीय.

नितेश राणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे कोणी आपली भावना व्यक्त केली असेल तर ते आम्हाला मान्य नाही. तर मुनी निलेशचंद्र यांच्या, त्यांनी केवळ मंत्रीच नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे, या इच्छेवर देखील भाष्य केलं आहे. राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री लाभले असून पुढचे 25 वर्ष देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असती, असे म्हणत मंत्री नितेश राणे यांनी जैन मुनी निलेशचंद्र यांनी केलेल्या वक्तव्यावरून फटकारले आहे.

दरम्यान बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा असताना मात्र ती मात्र आता शक्यता मावळताना दिसत आहे. यावर देखील नितेश राणे यांनी बोलताना, अजितदादा पवारांचे सर्वच राजकीय पक्षांशी संबंध होते. त्यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. ही निवडणूक लढवायची किंवा राजकारण करायची वेळ असे त्यांनी सुनावले आहे.

मुंब्राचे नाव बदलणार

तसेच यावेळी नितेश राणे यांनी मुंब्राचे नाव मुंबादेवी करण्याचा आमचा निर्धार असून तशी तिथल्या लोकांची भावना आहे. राज्य सरकारपर्यंत लोकांची भावना पोहोचण्याचे काम माझं आहे. जे आपण काल भाषणाच्या माध्यमातून केलं आहे. आता पाठपुरावा करू, असे म्हणत मुंब्राचं नाव मुंबादेवी करण्याचा निर्धार नितेश राणेंनी बोलून दाखवला आहे.

FAQs :

Q1. वादाची सुरुवात कशामुळे झाली?
👉 जैन मुनी निलेशचंद्र यांनी नितेश राणेंची तुलना शिवाजी महाराजांशी केल्याने वाद निर्माण झाला.

Q2. नितेश राणेंची प्रतिक्रिया काय होती?
👉 त्यांनी ही तुलना मान्य नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.

Q3. मुनींनी काय म्हटले होते?
👉 त्यांनी राणेंचे कौतुक करत त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली होती.

Q4. राणेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हटले?
👉 त्यांनी देवेंद्र फडणवीस हेच पुढील 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील असे सांगितले.

Q5. या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वाद आणि चर्चा वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT