Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांची थेट शरद पवार, उद्धव ठाकरेंना मदत! एकनाथ शिंदेंची कोंडी?

Uddhav Thackeray Sharad Pawar Vs Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडी करत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची मदत केल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde reacts to ‘Operation Tiger’ controversy, alleges political backing by Devendra Fadnavis.
Eknath Shinde reacts to ‘Operation Tiger’ controversy, alleges political backing by Devendra Fadnavis. sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले. या दौऱ्यामध्ये त्यांनी खासदारांची बैठक घेतली होती. ते पुन्हा महाराष्ट्रात आल्यानंतर ऑपरेशन टायगर अॅक्टिव्ह करत ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदारांना फोडण्याचे प्रयत्न त्यांच्या शिवसेनेकडून करण्यात येत होते.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सहा आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फोडण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेतून करण्यात येत होती. ठाकरेंनी सावध होत आपल्या खासदारांची बैठक देखील घेतली मात्र, या बैठकीत खासदांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याची चर्चा आहे.

त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या चर्चा होत्या. मात्र, फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मदत करत ऑपरेशन टायगरमधील हवाच काढून टाकली, या संदर्भातील वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

मोहित कंबोज याच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सर्व पक्षातील नेते कंबोजच्या पार्टीला हजर होते. आदित्य ठाकरे देखील तेथे गेल्याने चर्चांना उधाण आले होते. या पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ऑपरेशन टायगरची कल्पना दिली. मात्र, फडणवीसांनी या ऑपरेशनला नकार देत ठाकरे, पवारांचा पक्ष फोडण्यास विरोध केल्याची माहिती 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Eknath Shinde reacts to ‘Operation Tiger’ controversy, alleges political backing by Devendra Fadnavis.
Vidhan Parishad Election: उद्धव ठाकरेंसाठी आमदारकीची दुसरी टर्म कठीण? शिवसेना नेत्याचं मोठं विधान; म्हणाले,'एकनाथ शिंदेंना त्यांनी…'

फडणवीसांच्या विरोधाने शिंदेंचे ऑपरेशन टायगर फसल्याची चर्चा आहे. तर, फडणवीसांनी विरोध करत थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मदत केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आपल्या खासदारांची संख्या वाढवत बार्गेनिंग पाॅवर वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकनाथ शिंदेंना मात्र मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

ऑपरेशन टायगर थंड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेश टायगरला विरोध करत ठाकरे, पवारांचा पक्ष फोडू दिला नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगर थंड झाल्याची चर्चा आहे. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये देखील ठाकरे आणि पवारांचा पक्ष आता पुन्हा फोडण्याचे खापर आपल्या पक्षावर नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपमध्ये येण्याची इच्छा असलेल्या खासदारांना त्यांनी वेटींगवर ठेवले आहे.

Eknath Shinde reacts to ‘Operation Tiger’ controversy, alleges political backing by Devendra Fadnavis.
Eknath Shinde news : आमदारकीसाठी ठाकरेंचा फोन आल्यास मदत करणार का? एकनाथ शिंदेंनी वाढविली धाकधूक, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com