CM Devendra Fadnavis banner over maratha reservation sarkarnama
कोकण

मराठा आरक्षणानंतर भाजपने फडणवीसांना "शिल्पकार" ठरवले; दरेकरही म्हणाले, "देवा भाऊ बाहुबली, एकही मारा जोर से मारा"

Pravin Darekar On Devendra Fadnavis Over Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात पाच दिवस आमरण उपोषण केले. यानंतर महायुती सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठं मोठे बॅनर लागत आहेत.

Aslam Shanedivan

Summary :

  1. महायुती सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केला.

  2. सरकारच्या निर्णयानंतर भाजपने फडणवीसांना श्रेय देत जाहिराती व बॅनर्स लावले.

  3. बीडमध्ये सुरेश धस यांच्या मतदारसंघात मोठे पोस्टर्स झळकले.

  4. प्रविण दरेकर यांनी फडणवीसांना "देवा भाऊ बाहुबली" म्हणत जोरदार समर्थन दिले.

  5. या वक्तव्यामुळे मराठा आरक्षण श्रेयावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Ratnagi News : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते. पाच दिवस जरांगे यांनी आमरण उपोषण केले. यानंतर महायुती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवीन शासन निर्णय काढला. सरकारने आदेश काढताना सर्वात महत्वाचा हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. दैनिकाच्या पहिल्या पानावर फडणवीसांची मराठा आरक्षणाचे शिल्पकार अशी जाहिरात केली जात आहे. बीडमध्ये देखील फडणवीस यांचे बॅनर्स लागले असून ते भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात लागले आहेत. यावरून आता भाजपचे जेष्ठ नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, "देवा भाऊ बाहुबली, एकही मारा जोर से मारा" असे मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

जरांगे यांनी आमरण उपोषणाचे अस्त्र काढल्यानंतर महायुती सरकराने थेट हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. फक्त एका तासात याबाबत शासन आदेशही काढला. यानंतर आता फडणवीस यांच्याच काळात मराठा आरक्षणाच्यादृष्टीने पावले उचलली गेली याचा प्रचार आणि प्रसार भाजप करताना दिसत आहे. भाजप समर्थकांकडून मोठं मोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत. बॅनर्सही लावले जात आहेत.

नुकताच अशीच एक मोठी जाहिरात दैनिकाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाल्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील निशाना साधत टीका केली होती. दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात आता बॅनर्स झळकले असून त्यावर मनोज जरांगे पाटील आणि फडणवीस यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. ज्यात 'लढाई जिंकली बरं का...देवेंद्र बाहुबली, आरक्षणाचे जनक...' असा मजकूर लिहण्यात आला आहे. जो राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

दरेकर यांनी फडणवीस यांनी काही नेत्यांनी एका व्हिलनच्या रूपाय समोर आणले. काही नेत्यांनी त्यांचा वापर आपल्या राजकारणासाठी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी उभं केलं होतं. पण यात सगळ्यात हे विसरता कामा नये की आधीही देवा भाऊनेच मराठा आरक्षण दिलं होतं. जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना टिकवता आले नाही. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मराठा आरक्षण दिले. यानंतर आता देवा भाऊनेही मराठा आरक्षणाची उरला सुरला मुद्दाही संपवला.

पण मधल्या काळात फडणवीस हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असे काही लोकांनी प्रिप्लॅन त्यांना विरोध करण्याचा प्लॅन केला. परंतू 'देवा भाऊ हे देवा भाऊ आहेत. देवा भाऊ बाहुबली, एकही मारा जोर से मारा' आणि मराठा समाजाची मनं जिंकण्याचे काम केलं. आता बीड असो किंवा मुंबई येथे जे बॅनर्स लागले आहेत. त्यावरून हेच दिसत की देवा भाऊंबद्दल मराठा समाजात एक आदराचं आणि आपुलकीचं स्थान निर्माण झाल्याचे देरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या बॅनर बाजीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही फक्त विकासावर बोलतो या लगावलेल्या टोल्यावर देखील दरेकर यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी, असं कोठे फोटो टाकून कॅम्पेनिंग होत नसतं. तर त्या ठिकाणी त्या समाजाने उत्सफुर्तपणे जाहीर झालेल्या भावना आहेत. कोणीतर बाहुबली म्हटलं आहे, आम्ही काय त्यांना सांगायला गेलो होतो. तसेच मुंबईतही जी जाहिरात आणि बॅनरबाजी झाली ती काही आम्ही केलेली नाही. निवडणूकही विकासाच्या मुद्द्यावरच होत असते. त्यामुळे देवाभाऊही विकासाभिमुख असणारे नेतृत्व आहे. त्यामुळे महायुतीला अशा कॅम्पेनिंग आवशक्यता नसल्याचे स्पष्टीकरणही दरेकर यांनी दिले आहे.

FAQs :

प्र.१: सरकारने कोणता निर्णय घेतला?
उ. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला.

प्र.२: फडणवीसांना कसे प्रोजेक्ट केले जात आहे?
उ. त्यांना "मराठा आरक्षणाचे शिल्पकार" म्हणून जाहिराती व बॅनर्समधून दाखवले जात आहे.

प्र.३: बीडमध्ये काय घडलं?
उ. सुरेश धस यांच्या मतदारसंघात फडणवीसांचे बॅनर्स लावले गेले.

प्र.४: प्रविण दरेकर यांनी काय विधान केले?
उ. त्यांनी फडणवीसांविषयी "देवा भाऊ बाहुबली, एकही मारा जोर से मारा" असं मोठं विधान केलं.

प्र.५: या विधानाचा राजकीय परिणाम काय झाला?
उ. मराठा आरक्षणाचे श्रेय कोणाला यावरून महाराष्ट्रात नवा वाद पेटला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT