भाजपने विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
कोकणातून माजी आमदार प्रमोद जठार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीमुळे सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kokan News : राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीचे जोरदार वाहत असून महायुतीकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. भाजपच्या वाट्याला 6 जागा आल्या असून आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील एक नाव फायनल झाले आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप नाव जाहीर झालेले नाही. दरम्यान भाजपने आपल्या यादीत कोकणातून माजी आमदार प्रमोद जठार यांना संधी दिली आहे. ज्यामुळे कोकणात जल्लोष करण्यात आला आहे.
भाजपनं मंगळवारी (ता.28) रात्री विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी समोर आणली. ज्यात भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपने यादीत विवेक कोल्हे, संजय भेंडे, माधवी नाईक, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव आणि सुनील कर्जतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे भाजपने आपल्या यादीत कोकणातून माजी आमदार प्रमोद जठार यांना संधी दिली आहे. भाजपच्या यादीत जठार यांचे नाव जाहीर होताच सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
जठार यांनी २००७ मध्ये मुंबईतील खासगी बँकेमधील व्यवस्थापक पदाची नोकरी सोडून सिंधुदुर्गच्या राजकारणात प्रवेश केला होता. २००९ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यात त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार रवींद्र फाटक यांचा पराभव केला होता. जठार त्यावेळी विरोधी पक्षात असले तरी खारेपाटण आणि वैभववाडी बसस्थानक, आनंदवाडी बंदर प्रकल्प आदी विकास कामे मार्गी लावली होती.
२०१४ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली या वेळी मात्र तत्कालीन काँग्रेसमध्ये असलेले नीतेश राणे यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, २०२३ मध्ये जठार यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचेही तिकीट निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी नारायण राणे यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांची खासदारकीची संधी हुकली होती.
आता त्यांना विधान परिषदेसाठी भाजपने संधी दिली आहे. कणकवली तालुक्यातील परशुराम उपरकर, राजन तेली, विजय सावंत यांना विधान परिषदेवर संधी मिळाली होती. त्यानंतर आता प्रमोद जठार हे विधान परिषदेवर जाणार आहेत. विधान परिषदेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर ‘सकाळ’शी बोलताना जठार म्हणाले, ‘‘आता पुढील सहा वर्षाच्या कार्यकाळात कोकणातील अनेक विकास प्रकल्प मार्गी लावणे हेच ध्येय असणार आहे. रिफायनरीसह बंदर विकास आणि इतर प्रकल्प राबवून रत्नागिरी, सिंधुदुर्गातील लाखो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असणार आहे.’’
1. भाजपने किती उमेदवारांची यादी जाहीर केली आहे?
भाजपने विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
2. प्रमोद जठार यांना कुठून उमेदवारी मिळाली आहे?
त्यांना कोकणातून उमेदवारी देण्यात आली आहे.
3. जठार यांच्या निवडीवर कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय आहे?
सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
4. ही निवडणूक कोणत्या सभागृहासाठी आहे?
ही निवडणूक विधान परिषदेसाठी आहे.
5. या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या निर्णयामुळे कोकणातील राजकीय वातावरणात हालचाल वाढू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.