Narayan Rane On Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक! उद्धव ठाकरेंना धक्का तर राणेंचा कट्टर विरोधक शिवसेनेत घेणार

Rajan Teli Join Eknath Shinde’s Shivsena : मुंबईत दोन शिवसेनेंचा दोन विविध ठिकाणी दसरा मेळावा पर पडत आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यास सुरूवात झाली असतानाच त्यांना तळकोकणात मोठा धक्का बसला आहे.

Aslam Shanedivan

  1. राजन तेली यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. ते दसरा मेळाव्यात शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असून यामुळे उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे.

  3. ते दीपक केसरकरांचे प्रतिस्पर्धी आणि भाजप खासदार नारायण राणेंचे कट्टर विरोधक मानले जातात.

Mumbai News : आज विजयादशमी म्हणजेच दसरा असून राज्यात आज दसरा निमित्त पाच दसरा मेळावे होत आहेत. यामध्ये RSS, पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मेळावे झाले आहेत. तर आता मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पर पडत आहे. ठाकरे यांचा मेळावा सुरू झाला असून त्यांना भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. पण याचवेळी एकनाथ शिंदे यांना ठाकरेंना मोठा धक्का देत तळकोकणातील महत्वाचा नेता फोडला आहे. ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे राजन तेली यांचा आज शिवसेनेत प्रवेश होत आहे. तेली हे खासदार नारायण राणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. यामुळे शिंदे यांनी एकाच दगडात दोन निशाने साधळ्याचेही बोलले जात आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडत असतानाच राजन तेली यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात प्रवेश होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष सोडून राजन तेली यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी सावंतवाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा लढविली होती. ज्यात केसरकर यांनी तेलींचा मोठा पराभव केला होता. त्यानंतर ते नाराज होते. यानंतर आता त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक

राजन तेली यांनी दसरा मेळाव्यातच ठाकरेंच्या पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तो होणार देखील आहे. यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला शिंदे यांनी सुरुंग लावण्यासह मास्टर स्ट्रोक खेळल्याचे बोलले जात आहे. कारण राजन तेली हे भाजप खासदार नारायण राणेंचे कट्टर विरोधक मानले जातात.

राजन तेली यांची राजकीय वाटचाल :

राजन तेली यांनी शिवसेनेतून त्यांच्या राजकारणाला सुरुवात केली असून 1985 साली त्यांनी कणकवली येथील महाविद्यालयातच विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व केले. यानंतर 1988 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये शिवसेना शाखाप्रमुख पद. 1991 साली शिवसेना जिल्हाप्रमुख पद, 1995 साली जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषविले. 1997 साली ते कोकण सिंचन महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून गेले. तर 2005 साली राणे यांच्याबरोबर शिवसेना सोडत काँग्रेस सोबत गेले. 2007 साली ते विधान परिषदेवर आमदारही झाले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी विधानसभा लढवली मात्र त्यांचा शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी पराभव केला.

पुढे त्यांनी भाजपचा वाट धरली. त्यांच्यावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. यानंतर ऐन 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेलींनी भाजप सोडली आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी दीपक केसरकर यांच्याविरोधात दुसऱ्यांदा विधानसभा लढवली. मात्र शिंदेसेनेच्या केसरकर यांनी तेली यांचा 39 हजार 899 मतांनी पराभव केला. तेली यांना 41 हजार 109 मतं मिळाली.

तिसऱ्यांदा पक्ष बदलला...

मुळचे शिवसेनेचे असणारे राजन तेली 2024 ला ठाकरें यांच्यासोबत आले होते. दरम्यान त्यांनी काँग्रेस आणि भाजपमध्ये देखील प्रवेश केला होता. पण आता स्थानिकच्या तोंडावर आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलला असून ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

FAQs :

प्र.१: राजन तेली यांनी कोणता निर्णय घेतला आहे?
उ: त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्र.२: त्यांचा प्रवेश कधी होणार आहे?
उ: दसरा मेळाव्यात.

प्र.३: राजन तेली यांनी पूर्वी कोणाच्या विरोधात निवडणूक लढवली होती?
उ: त्यांनी 2024 मध्ये दीपक केसरकरांविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.

प्र.४: राजन तेली कोणाच्या विरोधक म्हणून ओळखले जातात?
उ: ते भाजप खासदार नारायण राणेंचे कट्टर विरोधक आहेत.

प्र.५: या प्रवेशाचा राजकीय परिणाम काय होईल?
उ: उद्धव सेनेला धक्का बसेल आणि शिंदे गटाची ताकद वाढेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT