
Shivsena UBT Dasara Melava 2025 : मुंबई महापालिका निवडणुका आता तोंडावर आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा महत्वाचा असल्यानं उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात हिंदुत्वाचा आवाज कायम ठेवत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला निशाणा बनवलं. यावेळी त्यांनी भाजपच्या एका नरेटिव्हला प्रत्युत्तर दिलं. ठाकरेंची मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास तिथं खान महापौर होईल असं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं होतं. याला जोरदार प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. जानवं घालून अदानीला समर्पयामी करणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
ठाकरे म्हणाले, "हे भाजपवाले आमच्या अंगावर येत आहेत, म्हणताहेत की यांनी मुंबई जिंकली तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकलीच तर... जिंकूही शकत नाही पण जिंकलीच तर अदानीच्या चरणावर तुम्ही मुंबई समर्पयामी करुन टाकाल. जानवं घालालं आणि शेंडी ठेवाल आणि अदानीला समर्पयामी. एक व्यापारी म्हणून तुम्ही मुंबईकडं बघता आहात. आम्हाला जर तुम्ही हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही भाजपला परत सांगतो की तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग तुम्ही काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाचा गप्पा मारा. तुमचं ते फडकंच आहे कारण तो भगवा असूच शकत नाही कारण भगवा हा शिवसेनेच्या हातात आहे"
"शंभर वर्षे झाल्यानंतर मी मोहन भागवतांना सांगतो की, तुमचे हे चेले चपाटे कसे आहेत. शंभर वर्षे झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का? की ज्या कामासाठी संघानं शंभर वर्षे मेहनत केली आणि त्या मेहनतीला ही विषारी फळं लागली आहेत. ही विषारी फळ बघितल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतोय का? की याचसाठी केला होता अट्टाहास. भागवत साहेबांना सांगता येत नसेल पण आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल पण ब्रह्मदेवाचा बाप नाही तर ब्रह्मराक्षक झालेला आहे. आमच्या अंगावर हिंदुत्व हिंदुत्व करुन येताना, मोहन भागवातांनी दिल्लीत मुस्लिम धर्मगुरुंची बैठक घेऊन घरोघरी पोहोचण्याची योजना आखली. त्यामुळं बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत त्यांना मी विचारतो की, मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडलं बोलण्याची हिंमत आहे का तुमची? हे एवढ्यापुरतं थांबत नाहीत. मोहन भागवत बोललेले आहेत की, या देशात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. मग तुमचे हे चेलेचपाटे जे हिंदू-मुस्लीम करत आहेत. हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे. ज्या सोफिया कुरेशी यांना हे भाजपवाले अतिरेक्यांची बहिण आहे म्हणत होते, ती सोफिया कुरेशी आमच्या सगळ्याची बहिण आहे हे आमचं हिंदुत्व आहे"
"भाजपनं काहीतरी एक दिशा ठरवावी तुम्हाला कुठे जायचं आहे?. कारण एकीकडं तुम्ही सोफिया कुरेशींना पाकिस्तान्यांची बहिण म्हणता, दुसरीकडं बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांचं स्वागत करुन तुम्ही मिरवणूक काढता आहात. त्याचवेळेला मोदी सांगत आहेत की मुस्लिम महिलांकडून रक्षाबंधन करुन घ्या. एकीकडं बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसरीकडं मोदी सांगतात लहानपणी त्यांच्या आजुबाजुला मुस्लिम लोकांची वस्ती होती, त्यांच्या घरात जेवणही मुस्लिमांच्या घरातून यायंच. काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का? नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का?"
काल परवा झालेल्या एशिया कपमध्ये जी क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि पाकिस्तानबरोबर? कशाला थोतांड केली ऑपरेशन सिंदूरची. तिथं पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या घातल्या मग एकतर तुमचं सरकारनं देशात बसलंय तुमच्या देशात हिंदू सुरक्षित नाहीए. बाप देशप्रेमाचं नाटक करतो आणि मुलगा क्रिकेट खेळतो ही तुमची घराणेशाही. एकीकडं तुमची नासलेली किडलेली घराणेशाही आणि दुसरीकडं आमची ठाकरेंची घराणेशाही याचा आम्हाला अभिमान आहे. मग कशाला घराणेशाही म्हणता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.