Sindhudurg News : गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर भाजप मंत्री नितेश राणे यांनी टीका केली होती. ज्याचा समाचार मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शेलक्या शब्दांत घेतला होता. यानंतर आता या वादात भाजप खासदार नारायण राणे यांनी उडी घेतली असून त्यांनी देखील महाजन यांचा शेलक्या शब्दांत पानउतारा केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियात एक पोस्ट केली असून याची सध्या चर्चा सुरू आहे. तर या पोस्टमुळे आता राणे विरूद्ध मनसे असा वाद लागण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटात युती होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. ज्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपकडून टीका करण्यात आली होती. भाजपचे मंत्री नितेश राणे आणि नीलेश राणे यांनी देखील यावरून जोरदार टीका केली होती. नितेश राणे यांनी, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही असा दावा करताना, आम्ही एवढं घाबरलोय की, आम्हाला आता झोप लागत नाही, अशी खोचक टीका केली होती. याच टीकेला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खरमरीत उत्तर दिले होते. महाजन यांनी नितेश राणेंना लवंग आणि विलायची उपमा दिली होती.
यानंतर आता महाजन यांच्या टीकेवर नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत महाजन यांनी, जे अकलेचे तारे तोडले त्याला आपण प्रत्युत्तर देत असल्याचे म्हटलं आहे. श्रीयुत राज ठाकरे आणि आपल्या (नारायण राणे) बद्दल आपण जे बोललात त्याबद्दल काहीच बोलायचे नाही. राज ठाकरे आणि आपले संबंध हे बोलण्याच्या पलीकडचे असल्याचे राणेंनी म्हटलं आहे.
यावेळी राणेंनी, प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात त्यांचे योगदान काय? कुठल्या एखाद्या पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करु नये. एवढी आपली कुवत नाही. श्रीयुत नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता, बुध्दीमता जनमानसातील प्रतिमा या वयात सिध्द केली आहे. श्रीयुत नीलेश, नितेश आणि माझी (नारायण राणे) वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात? असा सवालही राणेंनी महाजन यांना केला आहे.
आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन, असा टोलाही त्यांनी महाजन यांना लगावला आहे. महाजन आपण निलेश, नितेशना निष्ठा शिकविण्याची गरज नाही. तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून हे अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलटया करायला लावेन, असा दम देखील नारायण राणेंनी प्रकाश महाजन यांना भरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.