Narayan Rane : राणेंचा भाजपच्या प्रदेश प्रभारींनाच कडक इशारा; म्हणाले, 'इथं ढवळाढवळ चालणार नाही, हवं तर...'

Narayan Rane On Ravindra Chavan : आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. येथे भाजपमधला अंतर्गत वाद समोर आला असून माजी मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी थेट इशाराच दिलाय.
Narayan Rane And Ravindra Chavan
Narayan Rane And Ravindra Chavansarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : आगामी स्थानिकच्या आधीच भाजपमधील अंतर्गवाद आता चव्हाट्यावर आले आहेत. रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यकर्ता मेळाव्यात थेट असून माजी मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी, 'मी खासदार असेपर्यंत येथे कोणालाही ढवळाढवळ करू देणार नाही. कोणाला माझी तक्रार करायची असेल तर बिनधास्त करा. मला त्याची फिकीर नसल्याचे म्हणत नाव न घेता पक्षातंर्गत निवडीबाबत महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आम्हाला विचारूनच येथे नेमणुका व्हायला हव्यात. पक्षहितासाठी मी यापुढेही बोलणारच असेही सुनावले. यामुळे येथे माजी मंत्री विरोधात प्रदेश प्रभारी असा वाद सुरू झाला आहे.

शहरातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी कमी असलेल्या उपस्थितीवरून राणे यांनी कार्यकर्त्यांचा चांगला समाचार घेताना खडेबोल सुनावले. आगामी निवडणुका आणि त्याबरोबर तयारीच्यादृष्टीने मार्गदर्शन करताना काम करा, पक्ष वाढवा, ताकद मजबूत करा, लोकांचे प्रश्न सोडवा, आणि पक्षाला यश मिळवून देण्यासाठी तयार रहा अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी भाजपमधील धूसफूस, वाढलेले गटतट आणि कार्यकर्त्यांनी भरमेळाव्यात मांडलेल्या नाराजीमुळे खासदार राणे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पदाधिकाऱ्यांचे कानही टोचले आहे. यावेळी राणे म्हणाले, काल-परवा मी राजकारणात आलेलो नसून मी 18 व्या वर्षी शिवसेनेत काम करत होतो. तेव्हा आणि आत्ताही इर्ष्येने काम करत आहे. मी जिथे आहे तिथे शंभर टक्के काम करतो, असे म्हटलं आहे.

Narayan Rane And Ravindra Chavan
Narayan Rane : उद्धव अन् राज ठाकरेंवर नारायण राणे नेमके का संतापले?

पक्षाला सुरूंग लावण्यापेक्षा तो कसा मजबूत होईल, याकडे आता कार्यकर्त्यांनो लक्ष द्या. आपल्यातील किती लोकं आहेत याचाही कार्यकर्त्यांनी शोध घ्यावा. भांडणे ऐकायला आपल्याला वेळ नाही. मते का? मिळतील आणि पुढच्या निवडणुकीत ती कशी वाढतील? याचा निर्धार करणारा कार्यकर्ता हवा आहे. मतभेद बाजूला सारून पक्ष वाढवणारा कार्यकर्ता असावा, असे म्हणत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.

पालकमंत्र्यांविरूद्ध नाराजी

यावेळी राणे यांनी पक्षातील वरिष्ठांनाही इशाराही दिला असून येथे पदे देताना आम्हाला विचारावेच लागेल, असे ठणकावून सांगितले आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी पक्षांतर्गंत आढावा घेताना विकासकामांना निधी मिळत नसल्याचे सांगितले. पालकमंत्री उदय सामंत हे केवळ त्यांच्या पक्षातील लोकांनाच विकासनिधी देत असल्याचा मुद्दा मांडला. यावरून राणेंनी पालकमंत्र्यांविरूद्ध नाराजीही व्यक्त केली आहे.

Narayan Rane And Ravindra Chavan
Narayan Rane: ...तर उद्धव ठाकरेंचा आवाज बंद होईल..! राणेंनी शिंदेंना पुढं करत वर्मावरच घाव घातला; संजय राऊतांनाही झापलं

उबाठातून आलेल्याला शहराध्यक्षपद

या मेळाव्यात चित्रा चव्हाण यांच्यासह परिमल भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडताना पक्षात गट झाल्याची खंत व्यक्त केलीय. चव्हाण यांनी, आम्हाला राणे समर्थक म्हणून बाजूला ठेवले जाते. कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जात नाही. नेमणुकांमध्ये डावलले जाते. शहराध्यक्षपदासाठी 13 जणांचे अर्ज आले असता एकाचीही मुलाखत न घेता उबाठातून एकटेच आलेल्या आणि ज्यांचे दगड कार्यकर्त्यांनी खाल्ले अशा शशिकांत मोदींची निवड करण्यात आल्याची कैफियत राणेंसमोर मांडली. इतकेच नव्हे तर याबाबत आधीही तक्रार केली होती. पण काहीच फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही राणे समर्थक आहोत, शेवटपर्यंत राणे समर्थकच राहू असाही दावा त्यांनी यावेळी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com