5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे मतदान होणार असून निकाल 7 फेब्रुवारीला लागणार आहेत.
मतदानाआधीच कोकणात भाजपच्या 10 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
बिनविरोध विजयांच्या पॅटर्नमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला असून राजकीय चर्चांना वेग आला आहे.
Kokan Political News : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी फेब्रुवारी महिन्याच्या ५ तारखेला मतदान होणार आहे. तर या मतदानाचे निकाल 7 तारखेला लागणार आहेत. मात्र त्याआधीच राज्यात भाजपच्या विजयाची हवा वाहताना दिसत आहे. झेडपीच्या निवडणुकीआधीच कोकणात भाजपच्या १० उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि कणकवली पंचायत समितीत भाजपने हा विजयाचा बार उडवला असून यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिकेनंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोधचा पॅटर्न चर्चेत आला आहे.
राज्यातील ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मर्यादा न ओलांडणाऱ्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी आहे. तर 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून दोनच दिवसांनंतर म्हणजेच 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीनंतर राज्यात महायुती की महाविकास आघाडी भारी हे कळणार आहे.
पण राज्यातील एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवले होते. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत भाजपचे जवळपास 100 नगरसेवक आणि 6 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. तसेच भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये महायुतीनं 215 नगर पालिकांमध्ये विजय मिळवल्याचा दावा केला. तर त्यापैकी भाजपनं 129 नगर पालिकांमध्ये विजय मिळवल्याचे म्हटले होते.
त्या पाठोपाठ झालेल्या राज्यातील २९ महानगरपालिकेपैकी २३ महापालिकांमध्ये महायुती आणि भाजपाची सत्ता आली होती. ज्यात निवडणुकांच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. भाजपने १४२५ इतक्या जागा मिळवून मोठे यश मिळवले होते. तर याही निवडणुकीत भाजपचे राज्यात जवळपास 70 बिनविरोध नगरसेवक निवडून आले होते.
तर आता होऊ घातलेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपने आपला बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न कायम ठेवला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप निवडणुकीच्या आधीच विजयाचा गुलाल उधळला आहे. कणकवली पंचायत समितीच्या बिडवाडी मतदार संघात भाजपच्या उमेदवार संजना राणे बिनविरोध झाल्या आहेत. त्याच्या विरोधात दाखल झालेला ठाकरे गटाच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. वरवडे पंचायत समितीत भाजपचे अधिकृत उमेदवार सोनू सावंत यांच्याविरोधातील विरोधकांनी अर्ज मागे घेतल्याने तेही बिनविरोध झाले आहेत.
तसेच कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी चार अर्ज शुक्रवारी मागे घेण्यात आलेत. यामुळे भाजप मंत्री नितेश राणेंच्या कणकवली मतदारसंघात बिनविरोध निवडीचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (बिनविरोध)
१) खारेपाटण जि.प.उमेदवार : प्राची इस्वालकर(भाजप)
२) बांदा जिल्हा प.उमेदवार : प्रमोद कामत (भाजप)
३) जाणवली जि. प. उमेदवार : रुहिता राजेश तांबे (भाजपची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
४) पडेल – जिल्हा परिषद : सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
५) बापर्डे – जिल्हा परिषद : अवनी अमोल तेली (भाजप)
पंचायत समिती कणकवली( बिनविरोध)
१) देवगड तालुक्यातील वरवडे पंचायत समिती : सोनू सावंत (भाजपा)
२) पडेल : अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
३) नाडण : गणेश सदाशिव राणे (भाजप)
४) बापर्डे : संजना संजय लाड (भाजप)
५) वैभववाडी पंचायत समिती कोकिसरे गट : सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)
FAQs :
1) जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान कधी होणार आहे?
👉 मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
2) निकाल कधी जाहीर होणार आहेत?
👉 निवडणुकीचे निकाल 7 फेब्रुवारी रोजी लागणार आहेत.
3) भाजपचे किती उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत?
👉 कोकणात भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत.
4) बिनविरोध विजयांचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 विरोधकांना मोठा धक्का बसला असून आगामी सत्ता समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.
5) बिनविरोध निवडींचा पॅटर्न का चर्चेत आहे?
👉 नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही बिनविरोध विजयांचा ट्रेंड दिसत असल्यामुळे तो चर्चेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.