

नितेश राणेंनी मुंबईचा महापौर हिंदूच होणार असल्याचा ठाम दावा केला आहे.
राणे कुटुंबातील अंतर्गत मतभेद आणि नारायण राणेंच्या निवृत्तीच्या अफवांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
कोकण विकास हा आपला आणि भाजपचा प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Kokan Politics News : तळकोकणातील ३ नगरपालिका आणि १ नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. राणे कुटुंब म्हणजेच सिंधुदुर्ग असे समिकरण बनले असतानाच या वेळी मात्र माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी प्रचारातून काढता पाय घेतला. याचे कारण म्हणजे दोन्ही मुलांत सुरू असणारा संघर्ष. या संघर्षामुळेच राणे संपणार अशा चर्चा येथे सुरू झाल्या होत्या. त्यातच शेजारच्या जिल्ह्यात जावून नारायण राणेंनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. ज्यामुळे राज्यभर खळबळ उडाली.
यापार्श्वभूमिवर आता नितेश राणेंनी पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या असून त्यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमातील मुलाखतीत राणे कुटुंबातील जिव्हाळा, दोन भावांमधील नातं संघर्षाची चर्चा आणि वडील तथा खासदार नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या अफवांसह कोकणाच्या विकासावर त्यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत. तसेच त्यांनी मुंबईचा महापौर हा हिंदू होणार असल्याचं म्हणत कोकणातील विकासावर देखील भाष्य केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात सर्वाधिक चर्चेत राणे कुटुंब राहिलं आहे. निलेश आणि नितेश राणे या दोन्ही भावांमधील शीतयुद्ध. एकाने राखलेला गड आणि दुसऱ्याला आपल्याच होमपिचवर बसलेला धक्का यामुळे राणे कुटुंबात काहीच अलबेल नसल्याचे अधोरेखीत होत होते. अशातच नारायण राणेंनी आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितल्याने यात शंकेची पाल अधिकच चुकचुकली. यामुळे आता खरंच राणे कुटुंबात वादाची ठिणगी पडलीय का? दोन्ही भावांमध्ये फुट पडलीय का? असे प्रश्न कोकणासह राज्याच्या राजकारणात चर्चे येताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीच्या काळात भाजप नेते मंत्री नितेश राणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यात सतत खटके उडताना दिसले. त्यांच्यात वाद इतका वाढला की संघर्ष पेटल्या सारखे चित्र निर्माण झाले. ज्यावर निलेश राणेंनी निकालानंतर एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद असणारा मी काय बोलणार म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
यामुळे त्यांना नेमकं काय म्हणायचंय असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता. तर नितेश राणेंनीही आपला झालेला पराभव मान्य असल्याचे सांगत आपण विकासासाठी सर्वांना मदत करू असे म्हणत सर्वांचे अभिनंदन केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी ट्वीट करत आता बोलावं लागेल असा इशारा दिल्याने नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीतील वादावर अद्याप पडदा पडलेला नाही, असा संदेश सर्वत्र गेला.
या दरम्यान आज नितेश विरुद्ध निलेश राणे या संघर्षावर नितेश राणे यांनी थेट भाष्य केले आहे. त्यांनी, खुलासा करताना, दोन्ही भावांमध्ये कोणताही वाद नाही. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यामुळे तेथे नितेश विरुद्ध निलेश असा संघर्ष नव्हता. तर भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होता. आम्ही फक्त आपल्या आपल्या पक्षाचे काम केल्याचेही नितेश राणेंनी यावेळी स्पष्ट केले आहे.
तसेच त्यांनी, निलेश राणे हे शिवसेना पक्षाचे काम करत होते. त्या प्रमाणे मी माझ्या पक्षाचे काम करत होतो. ते त्यांच्या पक्षाची बाजू मांडत होते. मी भाजपची भूमिका मांडत होतो. भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. जर मी निलेश राणेंची किंवा शिवसेनेची बाजू घेतली असती किंवा निलेश राणे यांनी भाजपची बाजू घेतली असती तर आमच्यावर आरोप झाले असते. तसेच नारायण राणे यांनी आणि मी शिवसेनेची बाजू घेतली असती किंवा निलेश राणेंची बाजू घेतली असती तरी आरोप झाले असते.
पण तसे व्हायला नको, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अन्याय व्हायला नको म्हणून मी भूमिका घेतली. यातून काहींना आमच्यात वाद आहेत असे वाटले. याच वादावर त्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली. मात्र मुळात आमच्यात कोणताच वाद नाही असा खुलासा नितेश राणे यांनी केलाय. तसेच त्यांनी वडील तथा खासदार नारायण राणे यांनी केलेल्या निवृत्तीच्या घोषणेवर देखील भाष्य केलं आहे.
नारायण राणे साहेबांनी दिलेले निवृत्तीचे संकेत हे फक्त तुम्हालाच कळले. आम्हाला कळलेच नाहीत. कारण आम्ही सगळे स्टेजवरच होतो. पण ते स्वतः निवृत्त होणारे नाहीत तर ते सर्वांना निवृत्त करतील. त्यांना अजून खूप इनिंग खेळायच्या आहेत, अजून दहा ते बारा तास काम करणारे ते आहेत. निवृत्ती हा शब्द राणे साहेबांच्या डिक्शनरीमध्येच नाही म्हणून हे मिशन इनकंप्लेंट होतं. निवृत्तीचा काही विषय नाही. ते आपल्या भाषणमध्ये मी गप्प बसेल असे बोलले. जो त्यांचा समजावण्याचा प्रकार होता. निवृत्ती आणि राणे साहेबांचा काही विषय नाही त्यांना अजून खूप काम करायचे आहे, महाराष्ट्राने देशासाठी काम करायचं आहे. त्यांना खूप इनिंग खेळायच्या असून ते पॅड बांधून तयार आहेत असेही त्यांनी म्हटलं आहे.
1. नितेश राणेंनी मुंबई महापौराबाबत काय विधान केलं?
→ मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
2. राणे कुटुंबात मतभेद आहेत का?
→ मतभेद असले तरी कुटुंबातील जिव्हाळा आणि एकोपा कायम असल्याचे नितेश राणेंनी सांगितले.
3. नारायण राणे राजकारणातून निवृत्त होणार आहेत का?
→ निवृत्तीच्या अफवा निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
4. ही मुलाखत कुठे प्रसारित झाली?
→ साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या कार्यक्रमात ही मुलाखत झाली.
5. कोकण विकासाबाबत नितेश राणेंनी काय सांगितले?
→ कोकणाचा सर्वांगीण विकास हा आपला प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.