BJP, Shiv Sena
BJP, Shiv Sena Sarkarnama
कोकण

Konkan News : कोकणात पुन्हा भाजपचा शिवसेनेला धक्का; सत्ता राखण्यात मिळवले यश

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg News : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या झालेल्या निवडणुकीत भाजप (BJP) पुरस्कृत श्रम सहकार पॅनेलचे विठ्ठल देसाई अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी समीर ठाकूर विजयी झाले आहेत. विजेत्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला यादव यांनी जाहीर केले.

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ मर्यादित सिंधुदुर्ग या संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी सहकार निवडणूक विभागाने निवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार आज निवड प्रकिया पार पडली. जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ मर्यादित १३ संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणित श्रम सहकार पॅनेलला ७ जागा, तर शिवसेना (Shivsena) प्रणित समृद्धी सहकार पॅनेलला ६ जागा मिळाल्याने भाजप प्रणित श्रम सहकार पॅनेलने यावेळीही सत्ताम ठेवण्यात यश मिळवले.

आज झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी भाजप पुरस्कृत श्रम सहकार पॅनेलचे देसाई यांना ७ मते, तर समृद्धी सहकार पॅनेलचे बाबा आंगणे यांना ६ मते पडली. तर उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप श्रम सहकार पॅनेलचे ठाकूर यांना ७ मते, तर प्रतिस्पर्धी समृद्धी सहकारचे संभाजी साटम यांना ६ मते पडली आहेत.

कोणाचीही मते फुटली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उर्मिला यादव यांनी काम पाहिले. या सर्व प्रक्रियेसाठी सहकार विभागाचे श्रीकृष्ण मयेकर, मजूर सहकार संस्था संघाचे सचिव जी. टी. कदम आदींसह राजन परब, आप्पा गावडे, सुशील पारकर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT