Khopoli Murder Case CCTV Update Mangesh Kalokhe Murder Case  sarkarnama
कोकण

Raigad murder Case : मंगेश काळोखेंच्या हत्याकांडाचा थरार CCTV कैद, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Khopoli Murder Case CCTV Update : खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर रायगडसह राज्यात खळबळ उडाली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत आता खटके उडत आहेत.

Aslam Shanedivan

  1. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे पदाधिकारी मंगेश काळोखे यांची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली.

  2. हत्येचा थरारक CCTV फुटेज समोर आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.

  3. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची ग्वाही दिली आहे.

Raigad News : रायगडसह राज्याला हादरवणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे राज्यातील राजकारण आता ढवळून निघाले असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारेकऱ्यांना सोडणार नाही अशी ग्वाही दिली आहे. अशातच आता काळोखे यांच्या हत्याकांडाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यांची भर रस्त्यात पाच जणांनी मिळून धारदार शस्त्राने हत्या केल्याचे दिसत आहे. या सीसीटीव्ही व्हिडिओनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू असून नुकताच नगरपालिका आणि नगर पंचयतींच्या निवडणुकींचा निकाल लागला आहे. या विजयानंतर नवनिर्वाचित सदस्यांकडून आपल्या आपल्या प्रभागात विजय साजरा केला जात आहे. यादरम्यान रायगडमधील खोपीलीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

मंगेश काळोखे असे पदाधिकाऱ्याचे नाव असून ते स्व: माजी नगर सेवक होते. त्यांचीच आता भर रस्त्यावर हल्लेखोरांनी तलवार, कोयत्याने सपासप वार करून हत्या केली आहे. या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला असून हल्लेखोरांनी काळोखे यांच्यावर 24 ते 27 वार करून त्यांची हत्या केली आहे. या हत्येचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे.

समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओत हल्लेखोरांनी दगड, तलवारी, कोयता आणि धारधार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचं दिसन असून त्यांनी त्यांची पाठलाग करून हत्या केल्याचे दिसत आहे. यावेळी पाठलाग करताना हल्लेखोर दिसत असून पुढे जाऊन मंगेश काळोखे हे रस्त्यावर खाली पडले. त्यानंतर आधी दोन ते तिघांनी त्यांना घेरलं. त्यांच्यावर एकापाठोपाठ सपासप तलवार आणि कोयत्नाने वार केले. त्यानंतर 5 ते 6 हल्लेखोरांनी ते पडले असतानाच काळोखे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जवळपास 24 ते 27 वार केले होते. या भयानक हल्ल्यात काळोखे हे जागेवर कोसळले. काळोखे यांचा मृत्यू झाल्याचं समजून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर आता रायगडमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उठत असून प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना रायगडमध्ये जावून याची माहिती घेतली आहे. तसेच त्यांनी शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना धुडकावतं आमच्या कोणत्याच कार्यकर्ता अथवा पदाधिकाऱ्याचा यात सहभाग नसल्याचे म्हणत एसआयटीची मागणी केली आहे. तर मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी यात राष्ट्रवादीच्या लोकांचा हात असून त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे.

यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोलीमध्ये जाऊन मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं आहे. यावेळी त्यांनी, "मंगेश काळोखे यांची हत्या सुडा पोटी करण्यात आली असून अशा प्रवृत्तीच्या लोकांना फासावर लटकवण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. तसेच या प्रकरणात पोलीसांनी तपास अधिक तीव्रते करावा असे आदेश दिले असून हे प्रकरण स्फास्ट ट्रॅकवर चालवले जाईल. शिवाय या हत्येमागे जे कोणी असतील ते कदापी सुटणार नाही,असे आश्वासन शिंदे यांनी दिलं आहे.

FAQs :

Q1. मंगेश काळोखे कोण होते?
➡️ मंगेश काळोखे हे शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी होते.

Q2. हत्या कुठे आणि कधी झाली?
➡️ रायगड जिल्ह्यात खोपोली परिसरात भररस्त्यात ही हत्या झाली.

Q3. CCTV फुटेजमध्ये काय दिसते?
➡️ पाच जणांनी मिळून धारदार शस्त्रांनी हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे.

Q4. एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
➡️ मारेकऱ्यांना सोडणार नाही, कठोर शिक्षा दिली जाईल असे त्यांनी सांगितले.

Q5. या घटनेचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ राज्यातील राजकारण तापले असून कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT