Khopoli murder case : शिवसेनेच्या शिलेदाराच्या हत्येनंतर शिंदे आक्रमक, केली मोठी घोषणा; म्हणाले, 'केस फास्ट ट्रॅक अन् गुन्हेगारांना फासावर...'

CM Eknath Shinde reacts strongly after Khopoli Mangesh Kalokhe murder case : खोपोलीतील मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणात रायगड पोलीसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव समोर आले आहे.
Khopoli Mangesh Kalokhe murder case; CM Eknath Shinde
Khopoli Mangesh Kalokhe murder case; CM Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. खोपोली येथे शिवसेना पदाधिकारी मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.

  2. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 आरोपी ताब्यात आहेत.

  3. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबीयांची भेट घेत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मोठी घोषणा केली आहे.

Raigad News : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती तथा शिवसेनेचे पदाधिकारी मंगेश काळोखे यांची शुक्रवारी सकाळी निर्घुण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर रायगडसह राज्यभर खळबळ उडाली होती. तर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव समोर आले असून त्यांच्यासह खोपोली पोलीसांनी दहा जणांविरोधार गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलीसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध घेतला जात आहे. अशातच खोपोलीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी जावून काळोखे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी, मोठी घोषणा करताना सूडाचे राजकारण करणाऱ्याला सोडणार नाही, त्यांना फासावर टकवण्यासाठी काम करू असे म्हटलं आहे.

खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी सकाळी निर्घुण हत्या करण्यात आली होती. ते आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते. परत येताना त्यांच्यावर अज्ञातांनी धारधार शस्त्रांनी हल्ला करत त्यांची हत्या केली. ज्यानंतर येथील राजकीय वातावरण तंग झाले असून मानसी काळोखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उर्मिला देवकर यांचा पराभव केला होता. या रागातून उर्मिला देवकर यांचे पती रविंद्र देवकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगेश काळोखे यांची हत्या केल्याची चर्चा सुरू आहे. तर ही हत्या याच कारणातून झाल्याची फिर्याद खोपोली पोलीसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमुद आहे.

यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावर तंग झाले असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यांनी, दिवंगत मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच दिवंगत मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. या भेटीदरम्यान कुटुंबियांनी शिंदेकडे न्यायाची मागणी केलीय. त्यांनी, या हत्येमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सुधाकर घारे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप काळोखे कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांची लवकर अटक व्हावी, त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा यासह गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Khopoli Mangesh Kalokhe murder case; CM Eknath Shinde
Raigad murder Case : मंगेश काळोखे हत्याप्रकरण; गोगावलेंनी हत्येचं कारण सांगताच, संशयित राष्ट्रवादीच्या घारेंचा खळबळजनक दावा करणारा व्हिडिओ समोर... (Video)

यावेळी शिंदे यांनी, एका सामाजिक कार्यकर्त्याला, शिवसेनेच्या शिलेदाराच्या घरावर पाळत ठेवून अशा पद्धतीने ठार मारले आहे. त्यामुळे त्याच्या परिवारासह इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र झाल्या आहेत. म्हणून जे जे कोणी या केसमध्ये आरोपी आहेत. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. विशेष सरकारी वकील देऊन ही केस फास्ट ट्रॅकवर नेली जाईल. तर अशा प्रकारच्या वृत्ती आणि गोष्टींना ठेचून काढण्यासह अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कठोर कारवाई केली जाईल असेही शिंदेंनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी 'मंगेश काळोखे हत्येचा कट सुनील तटकरेंच्या घरी शिजला', असा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच 'रायगडचा आका हा सुनील तटकरे आहे', असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी, पोलिसांना इशारा देत, आरोपींना अटक झाली नाही पोलीस ठाण्याबाहेर बेमुदत ठिय्या देण्याचा इशारा दिलाय. पोलीसांनी रात्रभर शोध मोहीम राबवत नागोठणे येथे रविंद्र देवकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

तसेच खोपोलीतील काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी रवींद्र देवेकरचा मुलगा धनेश देवकर याच्यासह आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे आता येथील राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्यासह आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट नाव घेत केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, 'जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे', असं म्हणत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Khopoli Mangesh Kalokhe murder case; CM Eknath Shinde
Shivsena Mangesh Kalokhe murder case : राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा शिलेदार हत्यारा? शिवसेनेच्या काळोखेंच्या हत्येला राजकीय वळण, दहा जणांविरोधात गुन्हा दाखल
  1. FAQs :

    Q1. मंगेश काळोखे यांची हत्या कुठे झाली?
    👉 खोपोली, रायगड जिल्ह्यात ही घटना घडली.

    Q2. या प्रकरणात किती आरोपींवर गुन्हा दाखल आहे?
    👉 एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल असून 7 आरोपी ताब्यात आहेत.

    Q3. कोणत्या पक्षाच्या नेत्यांचे नाव समोर आले आहे?
    👉 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव समोर आले आहे.

    Q4. एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
    👉 त्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.

    Q5. पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचला आहे?
    👉 सात आरोपी अटक झाले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com