Chiplun Rane-Jadhav Clash Sarkarnama
कोकण

Chiplun Rane-Jadhav Clash : चिपळूण राडा राणे-जाधवांच्या अंगलट येणार? हायकोर्ट वकिलांची पोलिसांत धाव!

Chetan Zadpe

Konkan News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि भाजप नेते नीलेश राणे यांनी काल (ता. 16 फेब्रुवारी) बेकायदेशीरपणे जमाव जमवला. या जमावाकडून थेट हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली. तसेच दगडफेक करत एकमेकांच्या गाड्या फोडल्या. सामाजिक शांतता भंग केली. यामुळे आता हे प्रकरण दोन्ही नेत्यांच्या अंगलट येणार असल्याचे चिन्हे आहेत. या दोघांवरही गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील वकील ओवेस पेचकर यांनी शनिवारी येथील पोलिस स्थानकांत धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

वकील पेचकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हटले आहे की, चिपळूण हे शहर राजकीय-सामाजिक-ऐतिहासिक अनुषंगाने कोकणमधील एक महत्त्वपूर्ण शहर आहे. याला डाग लावण्याचे काम या दोन्ही नेत्यांनी केले. अतिशय खालच्या स्तरातील भाषा या दोन्ही नेत्यांनी वापरली. यामुळे या कोकणाची (Konkan) आणि चिपळून शहराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न यांनी केला. आपल्या कार्यकर्त्यांना भडकावून सामाजिक शांततेचा भंग केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत हायवेवर राडा केला. यावेळी सर्वसामान्य लोकांच्याही गाड्यांची तोडफोड झाली. सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सोसावा लागला. जनेतेला वेठीस धरण्यात आले. त्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला. विनाकारण हायवेवर वाहतुकीची कोंडी करण्यात आली.

या दोन्हीही नेत्यांनी स्वत:च्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सामान्य नागरिकांना त्रास होईल, अशी कृत्ये केली आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर भारतीय दंड विधान संहिता 141, 142, 143, 146, 147, 149, 152, 153, 157, 160, 323, 325, 336, 427, 431, 504, 505 या कलमान्वये तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच याची त्वरीत चौकशी करुन दोषींवर पोलिसांनी (Police) कारवाईचा भडगा उचलावा, अशी मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT