Bribery case Sarkarnama
कोकण

Bribe Case : ACB च्या धडक कारवाईने महसूल विभागाला हादरे, महिनाभरात दुसऱ्या मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना ठोकल्या बेड्या

ACB Action On Mandal Officer Over Bribery Case : जमीन खरेदीखताची नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूणमधील मंडल अधिकाऱ्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २) रंगेहाथ पकडले.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी रद्द केलेली फेरफार नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेताना चिपळूणचे मंडल अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील पाग नाका, पॉवर हाऊस परिसरात करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराने मौजे चिपळूण येथे जागा खरेदी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे व पत्नीचे नाव लावण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानुसार ११ जून २०२६ रोजी फेरफार नोंद घातली होती; मात्र मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांनी ती ८ जुलै २०२६ रोजी रद्द केली.

यानंतर तक्रारदाराने महसूल कर्मचारी पतसंस्थेत राजेशिर्के यांची भेट घेत याबाबत माहिती दिली. यावेळी रद्द झालेली नोंद मंजूर करण्यासाठी राजेशिर्के यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच २३ व २७ ऑगस्ट रोजी फोन करून फेरफार नोंद मंजूर केल्याचे सांगत लाचेच्या रकमेची मागणी केली.

एसीबीने आवळल्या मुसक्या

त्यानंतर तक्रारदाराने २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल करत याची माहिती दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली, ज्यात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पाग नाका, पॉवर हाऊस येथील मुंबई-गोवा हायवेवर सापळा रचत कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराच्या गाडीत येऊन पंचांसमक्ष १० हजार रुपयांची रोख लाच स्वीकारताना पथकाने मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याआधीदेखील सावर्डेचे मंडल अधिकारी अनिल जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्या कारवाईनंतर महिनाही उलटत नाही तोच दुसऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील कथित गैरप्रकारांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या कारवाईनंतर नागरिकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT