

Parbhani News : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी BLO ने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार परभणीत समोर आला आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) परभणी पथकाने मोठी कारवाई करत लाच मागणाऱ्या BLO ला सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून BLOचे नाव रामेश्वर विलास काळे असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेतला आता वेग आला असून नुकताच याला मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, परभणीत SIR प्रक्रियेचं काम करणाऱ्या BLO ने लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तक्रारदाराने आपल्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. पण संबंधित सदस्यांची नावे 2002 सालच्या मतदार यादीत नसल्याचे समोर आले होते. तर कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी BLO रामेश्वर विलास काळे याने तब्बल अडीच हजार रुपयांची लाच मागितली. तर तडजोडीनंतर दोन हजार रुपयांवर BLO तयार झाला.
यानंतर संबंधित तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीनंतर ACBकडून प्राथमिक पडताळणी करण्यात आली. ज्यात BLO रामेश्वर विलास काळे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचला. तर ठरल्याप्रमाणे BLO रामेश्वर विलास काळे याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACB ने रंगेहाथ पकडले. ACB ने BLO रामेश्वर विलास काळे याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.