Chiplun Municipal Mayor Election sarkarnama
कोकण

Mayor Election : मोर्चेबांधणीला वेग! नगराध्यक्षपदासाठी भाजपात सात इच्छुक; ठाकरे शिवसेनेची सावध भूमिका

Chiplun Municipal Election : चिपळुणात शहराच्या नगराध्यक्षपदासाठी दिवाळीत राजकारण तापताना दिसत आहे. येथे भाजपने जोरदार तयारी केली आहे

Aslam Shanedivan

  1. चिपळूण नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये आतून जोरदार चुरस निर्माण झाली असून एकूण सात इच्छुक दावेदार मैदानात उतरले आहेत.

  2. नगराध्यक्षपदासाठी कोणाला पक्षाचा हिरवा कंदील मिळतो, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

  3. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे.

Chiplun News : चिपळूणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी मोठी राजकीय घडामोड झाली होती. नुकताच विधानसभा निवडणूक लढवलेले प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. तर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील भाजप मित्र पक्षांसह विरोधकांना धक्का देण्याच्या तयारीत दिसत आहे. येथे चिपळूण शहराच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. तर उमेदवार देखील तयार ठेवले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल बाजले आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत झाल्यामुळे इच्छुक तयारीला लागले आहेत. दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार असले तरी त्याअगोदर इच्छुकांची चाचपणी सुरू झाली आहे. शहराच्या नगराध्यक्षपदासाठी देखील इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असून पक्षातील बड्या नेत्यांना गळ घालताना दिसत आहेत. यामुळे आघाडी आणि युती होण्याच्या आधीच येथे नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तसेच सर्वच पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे.

दरम्यान चिपळूण शहराचे नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले आहे. या वर्गात महिला उमेदवारही उभी राहू शकते. त्यामुळे भाजपमधील अनेक माजी नगरसेवकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. 19 तारखेपर्यंत भाजपने इच्छुकांकडे अर्ज मागवले होते. नगरसेवक पदाच्या 28 जागांसाठी भाजपकडे तब्बल 65 अर्ज आले आहेत. तसेच नगराध्यक्षपदासाठी 7 अर्ज आले आहेत. यामुळे नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे काहींनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी मात्र आता सावध पवित्रा घेतला आहे.

ठाकरे सेनेही निवडणूकीच्या तयारीत उतरली आहे. शहरातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच गुप्त बैठक झाली. ज्यात काहींनी नगराध्यक्षपदासाठी तर काहींनी नगरसेवकपदासाठी इच्छुक असल्याची भावना व्यक्त केली. ठाकरेंच्या शिवसेनेतही इच्छुकांची संख्या मोठी आहे. नगराध्यक्षपदासाठी जास्त इच्छुक आहेत. प्रभाग आरक्षणात ज्यांची नगरसेवक पदाची संधी हुकली आहे. ते वरिष्ठ कार्यकर्ते नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. तर काहींना घरातील सदस्यांना उमेदवारी मागितली आहे.

यावरून ठाकरे शिवसेनेने उमेदवारी मागणाऱ्यांना पक्ष आणि समाजासाठी काय योगदान दिले ते अगोदर सांगा अशी विचारणा केली आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पैशाच्या जोरावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले आणि इच्छुकांच्या गर्दीत सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांना आता चाप बसणार आहे. यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक वेगळा विचारात असल्याचे दिसत असून ते बुचकळ्यात पडले आहेत.

दरम्यान पालिका निवडणुकीत युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. आम्ही मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी दिली आहे. तसेच त्यांनी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याचे काम आम्हाला दिलेले आहे. ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत. सध्या इच्छुक कोण आहोत. कोणत्या ठिकाणी आपण कमकुवत राहू. युती झाली तर उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल आदी विषयावर प्राथमिक चाचपणी सुरू असल्याचेही सकपाळ यांनी म्हटलं आहे.

FAQs :

1. चिपळूण नगराध्यक्षपदासाठी किती इच्छुक आहेत?
→ या निवडणुकीत भाजपकडून सात इच्छुकांनी दावा दाखल केला आहे.

2. ही चुरस कोणत्या पक्षात आहे?
→ चिपळूण नगराध्यक्षपदासाठीची ही चुरस भाजपमध्ये पाहायला मिळत आहे.

3. ही निवडणूक कोणत्या पार्श्वभूमीवर होत आहे?
→ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चुरस रंगली आहे.

4. नगराध्यक्षपदासाठी अंतिम उमेदवार कोण ठरणार?
→ पक्षश्रेष्ठींकडून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

5. चिपळूणमध्ये भाजपमध्ये चुरस का वाढली आहे?
→ नगराध्यक्षपद हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनल्याने अनेक स्थानिक नेते व इच्छुक या स्पर्धेत उतरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT