Local Body Elections Maharashtra : लागा तयारीला! नगरपालिकेची नोव्हेंबरमध्ये घोषणा, डिसेंबरमध्ये मतदान; 'स्थानिक'च्या तयारीच्या आयोगाकडून हालचाली

Maharashtra Municipal Elections to Be Announced in November : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
Local Body Elections Maharashtra
Local Body Elections MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra nagar palika elections : राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, स्थानिकच्या जुळवाजुळवीसाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली असून, दिवाळी जोरदार करण्याची तयारीत आहेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) होऊन आठ ते साडेआठ वर्षे झाली आहेत. आता रखडलेल्या निवडणुका यावर्षी मार्गी लावण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी केली आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने त्रिस्तरीय योजना आखली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून आढावा घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुका घेण्याच्या हालचाली आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांची घोषणा करण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. डिसेंबरमध्ये यासाठी मतदान प्रक्रिया होईल. तसे राज्य निवडणूक आयोगाकडून संकेत मिळत आहेत.

Local Body Elections Maharashtra
Devendra Fadnavis travel : मुख्यमंत्र्यांनी अनुभवला यातनादायी खड्डेमय प्रवास; गडकरींना जमलं नाही ते फडणवीस करून दाखवणार का?

दहावी-बारावीच्या परीक्षा काळात महापालिका...

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका यानंतर लगेच घेण्याचे नियोजन आहे. डिसेंबर अखेरला या निवडणुकांचा घोषणा करण्याचे संकेत आहे. यानंतर जानेवारी महिना अखेरला महापालिका निवडणुका घेण्याचे नियोजन आहे. या काळात दहावी-बारावीची परीक्षा असल्याने निवडणू आयोग नेमकी काय भूमिका घेते, याकडे लक्ष असणार आहे.

Local Body Elections Maharashtra
Organ Trafficking Ahilyanagar : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! डाॅ. बहुरूपीसह पाच डाॅक्टरांकडून अवयवांची 'तस्करी'; मृतदेहाची परस्पर विल्हेवाट, गुन्हा दाखल

मतदान यंत्रांची जुळवाजुळव

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने 20 जानेवारीपूर्वी सर्व निवडणुका पार पाडण्याची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये निवडणुका घ्यायच्या असल्याने मतदान यंत्र मोठ्याप्रमाणात लागणार आहे. त्याची देखील चाचपणी इतर राज्यात निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आली आहे.

मतदार याद्यांचा घोळ

निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचा घोळावर विरोधक आक्रमक आहेत. आयोगाकडे शेकडो तक्रारी आहेत. निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशा मतदार याद्यांच्या राज्यभरात तक्रारी वाढत आहे. त्यावर काम होताना दिसत नाही. हा मुद्दा दिवाळीनंतर पेटण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या अनुषंगाने तयार केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिकसाठी संभाव्य नियोजन

नगरपालिका 247, नगरपंचायती 147 असून, नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची घोषणा अन् डिसेंबरमध्ये मतदान

जिल्हा परिषद 32, पंचायत समिती 336 असून डिसेंबरमध्ये निवडणुकीची घोषणा अन् जानेवारी मतदान

महापालिका 29 असून, जानेवारीमध्ये निवडणुकीची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com