Nilesh Rane, Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

Chiplun Rane-Jadhav Clash : भास्कर जाधवांच्या 13 समर्थकांना अटकपूर्व अंतरिम जमीन

Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav : निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेकीप्रकरणी सुमारे 350 ते 400 जणांवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri Political News : गेल्या आठवड्यात कोकणात चिपळूण येथे भास्कर जाधव व निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. भाजप नेते निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती. त्यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर केला होता. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी एकूण साडेतीनशे ते चारशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खेड सत्र न्यायालयाने तेरा जणांना गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

माजी खासदार राणेंच्या (Nilesh Rane) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार जाधवांच्या कार्यालयासमोर 16 फेब्रुवारी रोजी बेकायदेशीर जमाव जमला होता. त्यांनी अचानक मोठमोठ्याने शिवीगाळ, घोषणाबाजी व दगडफेक करुन राणे यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक केली. तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. रस्त्याच्या बाजुस असलेल्या दुकानांचे नुकसान केले. त्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये पोलिस अंमलदारांना दगड लागून दुखापत झाली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केला शासनाच्या वतीने भादंवि कलम 143, 145, 147, 149, 353, 160, 427, 337, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हामध्ये न्यायालयाने रवींद्र शिवाजी सुर्वे, धाकटू गणपत खताते, उमेश धाकटू खताते, सुमीत सुरेश शिंदे, शशिकांत श्रीकांत मोदी, शशिकांत सुधाकर साळवी, धनंजय चंद्रकांत अंबुर्ले, विजय श्रीपत साळवी, संदीप कृष्णा चव्हाण, जितेंद्र लक्ष्मण चव्हाण, विनोद लक्ष्मण झगडे, बशीर शरफुद्दीन चौगुले, राकेश पांडुरंग शिंदे यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी खासदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांचेत राजकिय वाद आहे. यातूनच राणेंच्या गुहागर दौऱ्यादरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. त्यानुसार चिपळूण रेस्ट हाउस, आमदार जाधव (Bhaskar Jadhav) यांचे संपर्क कार्यालय व निवासस्थान, पागनाका परिसर, पॉवर हाउस नाका, गुहागर बायपास रोडवरील देसाई बाजार परिसरात बंदोबस्त नेमण्यात आला होता.

माजी खासदार निलेश राणे यांच्या मिरवणुकीत अचानक दगडफेक सुरू झाली. त्या दगडफेकीमध्ये माजी राणे यांच्या ताफ्यातील वाहनांच्या नुकसान झाले. तसेच पोलीस हवालदार दीपक ओतारी, वेदा संतोष मोरे, सहाय्यक पोलिस फौजदार भूषण सावंत, अजित फणसे यांना किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी झालेल्या खेड जिल्हा व अति सत्र न्यायालयात (Court) सुनावणी झाली. त्यावेळी वरील सर्वांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. खेड जिल्हा व सत्र न्यायालयात जेष्ठ वकील अ‍ॅड. नितीन केळकर, अ‍ॅड. सोहम भोजने, अ‍ॅड. ऋषिकेश थरवळ यांनी काम पाहिले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT