Loksabha Election 2024 : पिंपरी-चिंचवडमधील गर्दीच्या मतदान केंद्रांची पोलिस आयुक्तांकडून पाहणी!

Pimpri - Chinchwad Police : निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा सराईत गुंडांना मोका, एमपीडीए आणि तडीपारीचा पॅटर्न
Pimpri - Chinchwad Police
Pimpri - Chinchwad PoliceSarkarnama
Published on
Updated on

Pimpri - Chinchwad News लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. ती गृहित धरून पोलिस खात्याने आपली दुहेरी तयारी सुरु केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील गर्दीच्या मतदानकेंद्रांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी स्वत: पोलिस आय़ुक्त (सीपी) विनयकुमार चौबे हे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने करीत आहेत. ती करताना ही निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी शहरातील सराईत गुंडाना तडीपार,तर काहींची रवानगी एमपीडीए, मोका अन्वये जेलमध्ये करण्यास सुरवात केली आहे.

मतदारसंख्या अधिक असलेल्या मतदानकेंद्रांची पाहणी करण्यास सीपींनी गेल्या काही दिवसांपासून सुरवात केली असून आतापर्यंत वीस केंद्रांचा धांडोळा त्यांनी घेतला आहे.गुरुवारी (ता.22) त्यांनी आणि डीसीपी (झोन ३) शिवाजी पवार यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील जास्त बूथ असलेल्या महादू सस्ते मनपा शाळा बोराडेवाडी, सावित्रीबाई फुले मनपा शाळा मोशी गावठाण, नागेश्वर विद्यालय मोशी या तीन मतदान केंद्रांना भेटी दिल्या.तेथील बुथ व मतदान केंद्र परिसराची पाहणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pimpri - Chinchwad Police
Lok Sabha Election 2024 : मावळवरून महायुतीमध्ये रस्सीखेच; शेळकेनंतर अजित गव्हाणे सरसावले, बारणेंचे टेन्शन वाढले

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पुणे जिल्ह्यातील मावळ,शिरुर,पुणे आणि बारामती हे चारही लोकसभा मतदारसंघ येतात.तेथील मतदारसंघावर लावण्यात येणाऱ्या बंदोबस्ताचा आराखडा तयार करण्यास चौबेंनी सुरुवात केली आहे. एकीकडे ही तयारी करताना दुसरीकडे त्य़ांनी निवडणुकीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सराईत गुंडाविरुद्ध प्रतिबंधक कारवाईही सुरु केली आहे. त्यासाठी मोका,एमपीडीए चे हत्यार उपसले आहे.आगामी लोकसभा निवडणूक ही पारदर्शक, निष्पक्ष, निर्भय वातावरणात पार पाडण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सरकारनामाला सांगितले.

निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून १७ सराईत गुन्हेगारांना एक आणि दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे. त्यात पिंपरी आणि देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अधिक गुंड आहेत.त्याजोडीने निगडी, वाकड आणि पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुंड टोळ्यांना त्यांनी मोका लावला. त्यात सुरज उत्तम किरवले, रोहित मोहन खताळ आणि अमन शंकर पुजारी यांचा समावेश आहे.

तर,संदेश ऊर्फ शिलव्या राजरस चोपडे,अनिकेत ऊर्फ गुड्या संजय मेटकरे आणि दिपक सुरेश मोहिते या तीन सराईत गुंडांची रवानगी एमपीडीए अन्वये तुरुंगात केली आहे. ही कारवाई पुढेही सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Pimpri - Chinchwad Police
Shirur Lok Sabha Election 2024 : "...तर मी अजित पवारांसाठी काम करणार," आढळरावांचं मोठं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com