BJP Sarkarnama
कोकण

BJP Leader joins shivsena : भाजपला धक्का! चिपळूणचा बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत; कोकणात नवीन राजकीय मांडणी

BJP Leader joins shinde shivsena : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये राजकीय भूकंप झाला असून भाजपने हाकाल पट्टी केलेल्या चार बड्या नेत्यापैकी एकाने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Aslam Shanedivan

  1. परिमल भोसले यांची भाजपमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

  2. या प्रवेशावेळी अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला स्थानिक पातळीवर धक्का बसल्याची चर्चा आहे.

  3. चिपळूण शहरातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

chiplun political news : चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपने चिपळूणातील चौघांची पक्षातून हकालपट्टी केली होती. ज्यात माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडेंसह भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांचा समावेश होता. या घटनेनंतर चिपळूणात एकच खळबळ उडाली होती. पण आता याच परिमल भोसले यांनी भाजपला जोरदार धक्का दिला असून थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी त्यांनी आपल्या सोबत असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणल्याने भाजपमध्ये राजकीय भूकंप झाल्याची चर्चा असून शिवसेनेची येथे ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. तर या प्रवेशामुळे चिपळूणच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

चिपळूण पालिकेची दोन महिन्यापूर्वी निवडणूक झाली होती. त्यावेळी परिमल भोसले यांनी पक्षाचा आदेश धुडकावून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्यासह सुधीर पानकर, सुरेखा खेराडे आणि श्रीराम शिंदे यांचे पक्षाने निलंबन केले होते. पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांची हाकालपट्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती. चिपळूण शहराच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून सौ. सुरेखा खेराडे यांनी (२०१७) काम केलं होतं. परिमल भोसले यांना भाजपकडून स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती.

यावेळी करण्यात आलेल्या हाकालपट्टीवरून परिमल भोसले यांनी भाजपवर पलटवार करत पालिकेच्या निवडणूकीत मला उमेदवारी देण्यात आली नाही तेव्हा मी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यामुळे पक्षातून निलंबित करण्याचा प्रश्न येत नाही. नसल्याची टीका केली होती. यानंतर ते कोणती भूमिका घेतात याकडे चिपळूणसह जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

यानंतर आता भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. चिपळूण शहरातील राधाताई लाड सभागृहात कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भोसले यांनी प्रवेश केला. त्याच्या या प्रवेशामुळे चिपळूणच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तर आता निलेश राणे यांनी दिलेल्या राजकीय इशाऱ्याची चर्चा होताना दिसत आहे.

निलेश राणे यांनी, “पक्षप्रवेश विश्वासाने होतो; कुणीही सहजपणे आपले जुने राजकीय घर सोडत नाही. तिथे काहीतरी दुखावले गेले म्हणूनच हे कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. आता त्यांना आपलेपणाची जाणीव देणे ही आमची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. तसेच परिमल, राजकीय भवितव्याची अजिबात चिंता करू नकोस. तुझं भविष्य शंभर टक्के शिवसेनेत उज्ज्वल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आता या मोठ्या पक्षप्रवेशामुळे चिपळूणमधील राजकीय वर्तुळ ढवळून निघाले असून, आगामी काळात शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढण्याचे संकेत मिळत आहेत. हा प्रवेश विरोधकांसह भाजपसाठी धक्का मानला जात आहे.

FAQs :

1. परिमल भोसले यांना भाजपमधून का काढण्यात आले होते?
चिपळूण पालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

2. त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.

3. या प्रवेशाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
चिपळूणमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

4. त्यांच्या सोबत किती जणांनी प्रवेश केला?
अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.

5. भाजपची भूमिका काय असू शकते?
स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी भाजपकडून पुढील रणनीती आखली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT