Rajkot Statue of Chhatrapati Shivaji Maharaj And CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde sarkarnama
कोकण

CM Devendra Fadnavis : 'ती घटना दुर्दैवी, पण आता हा पुतळा 100 वर्षे...'; मुख्यमंत्री फडणवीस यांना विश्वास

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj : कोकणातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा उभारण्यात आला असून आज (ता. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : कोकणातील मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा शिल्पकार सुतार यांनी तयार केला आहे. जो जवळपास 91 फुटांचा असून देशातील सर्वात उंच पुतळा आहे. तर आता कितीही सोसाट्याचा वारा सुटो किंवा वादळ येवो हा पुतळा पुढील किमान 100 टिकेल अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते येथे आनावरण समारंभासाठी आले असताना बोलत होते. यावेळी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

100 वर्षे टिकेल

कोकणातील मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांनी, या पुतळ्याला आता वादळही हलवू शकत नाही, असे म्हणताना याआधी पुतळा कोसळल्याच्या घटनेचा उल्लेख केला. तसेच त्या घटनेनंतरच आम्ही पुतळ्याची उभारणीचा निर्धार केला. फक्त निर्धारच केला नाही. तर ठरलेल्या कालावधीत जवळपास 91 फुटांचा पुढील किमान 100 वर्षे टिकेल अशा पुतळ्याची उभारणी केली. तर या पुतळ्याला किमान 100 वर्षे काहीही होणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिलीय.

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज स्वाभिमानाने अणि भव्यतेने उभा झाल्याने ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. तर निर्धारीत वेळेत त्या घटनेनंतर आज पुतळा पुन्हा उभा झाला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचं अभिनंदन. शिल्पकार सुतार यांनी अतिशय उत्तम दर्जाचा हा पुतळा तयार असून त्यांच्यासह आयआयटीचे इंजिनिअर, जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या लोकांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना, यापूर्वीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कोकणाला झुकते माप देण्यात आले. पण आता कोकण विकासासाठी काम सुरू झाले असून नुकताच मच्छिमारांना शेतकऱ्यांना प्रमाणे दर्जा देण्यात आल्याचेही ते म्हणालेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील मागील घटनेचा उल्लेख करताना, आजचा दिवस आनंदाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा शौर्याचे प्रतीक आहे. हातात समशेर असलेला पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभा झाल्याने आता इकडे वाकड्या नजरेनं कुणीही बघणार नाही. हे स्मारक महाराष्ट्राचे आणि शिवभक्तांचे प्रतीक असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.

तसेच आम्ही केवळ पूजा आणि आरती करण्यासाठी येथे आलो असून यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथे पुतळ्याचे अनावरण केले होते. पण ते सध्या भारतीय जवानांच्या पाठीशी उभे आहेत. तेही शिवकार्य करत आहेत. तर हे स्मारक पर्यटक आणि शिवभक्तांसाठी आदराचे स्थान ठरेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT