Nana Patole-Uddhav Thackeray  Sarkarnama
कोकण

Konkan Politics : तीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा

Mahavikas Aghadi seat Allotment : महाविकास आघाडीत तीन पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष कमी-जास्त प्रमाणात एकमेकांच्या मतदारसंघावर हक्क सांगताना दिसत आहेत.

Vijaykumar Dudhale

Rajapur, 03 September : महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या लांजा-राजापूर (जि. रत्नागिरी) मतदारसंघावर दावा केला आहे. कोणत्याही परिस्थितीत राजापूरमधून काँग्रेसच निवडणूक लढवेल, असे सांगून जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी शिवसेनेला एक प्रकारचे चॅलेंज दिले आहे.

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) तीन पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) हे तीनही पक्ष कमी-जास्त प्रमाणात एकमेकांच्या मतदारसंघावर हक्क सांगताना दिसत आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्यावर महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची डोकेदुखी वाढणार आहे, हे मात्र निश्चित.

राजापूर मतदारसंघाचे (Rajapur Constituency) आमचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण हातणकर यांनी नेतृत्व केलेले आहे. काँग्रेसचे नेतृत्व करत असताना त्यांनी वेगळ्या पद्धतीचे काम राजापूर मतदारसंघात केलेले आहे. आजही त्यांची कामं दाखवली जातात. काँग्रेस पक्षाच्या काळात झालेली कामे आजही दर्जेदारपणे उभी आहेत. त्यामुळे राजापूर मतदारसंघात बदल हवा आहे, अशी आता लोकांमधूनच मागणी होत आहे.

शिवसेना आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे घटक आहोत, त्यामुळे ताटातील वाटीत आणि वाटीतील ताट्यात एकच असणार आहे. त्यामुळे राजापूर मतदारसंघावरील दावा काँग्रेस पक्ष कदापि सोडणार नाही. विधानसभेची आगामी निवडणूक काँग्रेस पक्ष शंभर टक्के लढवणार आहे, असेही जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी ठासून सांगितले.

कोकणातील राजापूर मतदारसंघातून १९९५ पासून शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे. सलग २९ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर आता चक्क काँग्रेस पक्षानेच दावा केला आहे, त्यामुळे शिवसेना आपल्या हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडणार का खरा प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेने लढवल्या आहेत. आता विधानसभेलाही शिवसेना जास्तीच्या जागांसाठी आग्रही आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा येतात, हे पाहावे लागणार आहे. त्यानंतर कोणी कोणाच्या मतदारसंघावर दाव केला आहे, हे समजणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT