Assembly Election 2024 : विश्वजित कदमांच्या बालेकिल्ल्यातून महाविकास आघाडी फुंकणार विधानसभेचं रणशिंग

Mahavikas Aghadi News : माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीचा मेळावा घेण्यासाठी नियोजन सुरू केले आहे.
sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
sharad pawar | uddhav thackeray | Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

लोकसभेला 31 जागा जिंकत महायुतीला महाविकास आघाडीनं चारीमुंड्या चित केलं आहे. लोकसभेला आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. सांगलीतील कडेगाव येथे महाविकास आघाडीचा 5 सप्टेंबरला मेळावा होणार आहे. येथून महाविकास आघाडी विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रसेचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकलं जाणार आहे. यावेळी काँग्रसचे दिवंगत ज्येष्ठ नेते, पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे.

sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
Vidhansabha Election survey : राज्यात विधानसभा निवडणुका आता झाल्यास कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? सर्वांत मोठा सर्व्हे आला समोर

माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी हा मेळावा घेण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. महाविकास आघाडीच्या ( Maha Vikas Aghadi ) घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना डॉ. विश्वजित कदम यांनी निमंत्रण दिलं आहे. यातील बहुतांशी नेत्यांनी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी तयारी दर्शवली आहे.

sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
MVA News : नागपुरवरुन 'मविआ'त ठिणगी; हायकमांडकडे बोट दाखवत काँग्रेसने केले मोठं विधानं

कडेगावात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीची सांगता मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. याठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा होणार आहे.

महाविकास आघाडीची एकजूट दिसणार

डॉ. विश्वजित कदम यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकजूट दाखविण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com