Congress, NCP Sarkarnama
कोकण

Congress Insist For Maval : राष्ट्रवादीच्या 'मावळ'वर काँग्रेसचा डोळा; थेटच मांडलं विजयाचं गणित

NCP Candidate in Maval Loksabha : मावळातून राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन वेळा पराभव

सरकारनामा ब्यूरो

Congress Insist For aval Loksabha Seat : एकेकाळी कोकणात वर्चस्व असलेल्या काँग्रेसकडे लोकसभेसाठी दावा करता येईल, असा एकही मतदारसंघ शिल्लक राहिलेला नाही. यामुळे निदान मावळची तरी जागा काँग्रेससाठी सोडावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत ही जागा लढवण्यास इच्छुक आहेत.

रायगड जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीची बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथे बुधवारी (ता. १४) पार पडली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवताना मावळ मतदारसंघात काँग्रेस विजय मिळवेल, असा विश्वास घरत यांनी व्यक्त केली. भिवंडी सोडल्यास कोकणात दावा करता येण्यासारखी एकही जागा काँग्रेसकडे नाही. त्यामुळे मावळची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Latest Marathi News)

यावेळी महेंद्र घरात (Mahendra Gharat) यांनी युतीच्या उमेदवाराचा पराभव करणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, "या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा सलग तीन वेळा पराभव झालेला आहे. सध्याची परिस्थिती काँग्रेसला पोषक आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, कर्नाटकमध्ये काँग्रेसने मिळवलेला विजय, यासह पोटनिवडणुकांमध्येही पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. मावळ मतदारसंघात शेकापचे विवेक पाटील, ठाकरे गटाचे मनोहर भोईर यांची ताकद आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या मतदारांच्या मदतीने विरोधकांवर मात करणे शक्य आहे."

मावळची (Maval) जागा मिळण्यासाठी निवडणूक कमिटीकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या ही कमिटी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे. मावळच्या बाबतीत आम्ही वरिष्ठांकडे प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीसाठी रायगडच्या प्रभारी चारुलता टोकस यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे चंद्रकांत पाटील, राणी अगरवाल उपस्थित होत्या. या बैठकीसाठी जिल्ह्याभरातील काँग्रेस कार्यकर्तेही आले होते.

जिल्हा कमिटीची नव्याने रचना

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने रायगड (Raigad) जिल्हा काँग्रेस कमिटीची नव्याने रचना करण्यात येत आहे. यामध्ये जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह तीन वरिष्ठ उपाध्यक्ष, २९ उपाध्यक्ष, १९ सरचिटणीस नियुक्त करण्यात आले आहेत. पूर्वीचे दिवस प्राप्त करून देताना अगदी शून्यातून सुरुवात करण्यास काँग्रेस कमिटीची रचना करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसच्या रायगड जिल्हा प्रभारी चारुलता टोकस यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT