Chitra Wagh On Supriya Sule : सत्तेचा 'स्ट्राईक रेट' काढत चित्रा वाघांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा; म्हणाल्या...

State Government : राज्यातील गृहविभाग निष्क्रिय असल्याचा सुळेंचा आरोप
Supriya Sule, Chitra Wagh
Supriya Sule, Chitra WaghSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. चालू लोकल ट्रेनमधील महिला डब्ब्यात आरोपीने तरुणीवर अत्याचार केला आहे. ही संतापजनक घटना 14 जून रोजी सकाळी घडली. पीडित तरुणी परीक्षेला जात असतानाच तिच्यासोबत ही घटना घडली. आरोपीला संबधित प्रकारानंतर आठ तासात अटक करण्यात आली. (Latest Marathi News)

या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. गृहखाते निष्क्रय झाल्याची टीका सुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे. सुळेंच्या या ट्विटला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारेच प्रत्युत्तर दिले आहे. वाघ यांनी हा अत्याचाराचा प्रकार नसून विनभंगाचा असल्याचा दावा केला आहे. राज्यातील या दोन महिल्या नेत्यांच्या ट्विटवॉरमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Supriya Sule, Chitra Wagh
Chitra Wagh On Sanjay Raut: वाह रे नौटंकीबाज ! चित्रा वाघ संजय राऊतांना असं का म्हणाल्या ?

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

"संतापजनक! चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे."

Supriya Sule, Chitra Wagh
Sahkar Shiromani Election : सहकार शिरोमणी काळेंकडेच राहणार की अभिजीत पाटील बाजी मारणार? सभासद उद्या करणार फैसला...

चित्रा वाघ यांचे उत्तर

"अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय. सत्तेचा 'स्ट्राईक रेट' कमी झाल्याचा हा परिणाम आहे, हे आम्ही समजू शकतो. पण लोकलमध्ये घटनेची थोडी शहानिशा तरी करायला हवी होती. तुम्ही लोकल रेल्वेत बलात्कार झाला असं म्हणता, पण तसं काहीच घडलं नाही. नाहक मुलीची बदनामी करू नका. त्या आरोपीने मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल त्याला अटक केली."

सुळे यांनी खोट्या बातम्यांना हातभार लावल्याचाही आरोप चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला. त्या म्हणाल्या, "तुम्ही मुंबई पोलीस आयुक्तांकडून घटनेची माहिती घेऊ शकला असता.पण ते न करता बलात्कार झाल्याचे तुम्ही थेट सांगितले. तुमच्या या वक्तव्यामुळे खोट्या बातम्यांचा आणि अफवांचा सुकाळ होण्यास हातभार लागणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अफवा पसरवू नका आणि माझी संपूर्ण जनतेला विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका !"

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com