काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कुणबी समाजाचे नेते यशवंत कृष्णा फके यांचे निधन झाले आहे.
ओझरवाडी येथे मानाच्या ताटाच्या वादातून झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते.
उपचारानंतर घरी विश्रांती घेत असताना त्यांची प्रकृती खालावून निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Chiplun News : शहरातील ओझरवाडी शंकर मंदिरसमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून झालेल्या वादविवादातून काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कुणबी समाजाचे नेत्याला जबर मारहाण करण्यात आली होती. चौघांकडून त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. ज्यात त्यांचे निधन झाले असून यशवंत कृष्णा फके (वय ७३) असे त्यांचे नाव आहे. तर या घटनेनं रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये आता खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी २९ एप्रिलला दुपारी ओझरवाडी शंकर मंदिरसमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून झालेल्या वादविवाद झाला होता. येथे फके यांना चौघांकडून मारहाण झाली होती. ज्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार झाले होते. तर उपचारानंतर ते घरी विश्रांती घेत होते.
मात्र, शुक्रवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा अचानक मृत्यू झाला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
फके यांच्या निधनाची माहिती समजताच त्यांचे नातेवाईक व ओझरवाडीतील नागरिक कामथे रुग्णालय येथे जमले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतर प्रकरण शांत झाले आणि नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. दुपारी रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काँग्रेसचे निष्ठावान
फके हे काँग्रेसचे निष्ठावान व ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित होते. चिपळूण शहर व तालुक्यात त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षे सक्रिय सहभाग होता. तर त्यांनी अनेकदा नगर परिषदेच्या निवडणुकाही लढवल्या होत्या.
ते काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कुणबी समाजाचे नेते होते.
२९ एप्रिल रोजी ओझरवाडी येथे त्यांच्यावर हल्ला झाला होता.
शंकर मंदिरासमोरील मानाच्या ताटाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते आणि उपचारानंतर घरी विश्रांती घेत होते.
परिसरात शोककळा पसरली असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.