Congress Leader Murdered: काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या; लग्नाच्या काही दिवस आधीच दुर्दैवी अंत! CCTV मध्ये थरार कैद

Youth Congress Leader Fairoz Pathan Murdered: धारवाडमध्ये काँग्रेस नेते फिरोज पठाण यांची अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या केली. लग्नाच्या काही दिवस आधीच घडलेली ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.
Youth Congress Leader Fairoz Pathan Murdered
Youth Congress Leader Fairoz Pathan MurderedSarkarnama
Published on
Updated on

Fairoz Pathan Murdered News: गाढ झोपेत असताना काँग्रेसच्या युवा नेत्यावर अचानक हल्ला करुन त्यांची हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. धारवाड (कर्नाटक) येथे ही घटना घडली आहे. फिरोज पठाण असे मृत नेत्याचे नाव आहे.पठाण हे युथ काँग्रेसचे सरचिटणीस होते.

चार अज्ञात व्यक्तींना फिरोज पठाण (Fairoz Pathan Murdered) यांच्या घरात घूसून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. यात गंभीर जखमी झाल्यानंतर पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ज्यावेळी त्यांची हत्या झाली त्यावेळी त्यांच्या परिवारातील कुठलीही व्यक्ती तेथे नव्हती. हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आता तणावपूर्ण शांतता आहे.

Youth Congress Leader Fairoz Pathan Murdered
Sunetra Pawar News: चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT कडे तक्रार

जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.फिरोज पठाण यांच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी धारवाड परिसरात पसरली. काही वेळानंतर त्यांचे कुटुंबिय येथे आले.हत्येचे स्पष्ट कारण अद्याप समजलेले नाही. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहे.

Youth Congress Leader Fairoz Pathan Murdered
IT company Sexual Abuse: आयटी कंपनीतील महिलांचा धर्मांतरासाठी छळ; NIA, ATS करणार चौकशी?

फिरोज पठाण यांचे येत्या 24 तारखेला लग्न होते, त्यांच्या लग्नाची तयारी कुटुंबिय करीत होते. त्यांच्या हत्येमुळे कुटुबियांवर शोककळा पसरली आहे. ही हत्या जुन्या वादातून घडली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांचं संपूर्ण पथक आरोपींचा माग घेत आहेत. याप्रकरणी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल, असे असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com