Deepak Kesarkar Vs Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Deepak Kesarkar News : 'आपण किती खोके घेतो याचा विचार करावा, दुसऱ्याला..' ; केसरकरांचा ठाकरेंवर निशाणा!

Deepak Kesarkar Vs Uddhav Thackeray :'टोमणे मारण्याशिवाय सध्या त्यांना दुसरे काही काम नाही.', असंही केसरकरांनी म्हटलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg News : मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधला आहे. 'आपण किती खोके घेतो याचा विचार करावा, दुसऱ्याला बोलू नये. मंत्री होण्यासाठी पैसे मागितले होते की यांचे त्यांनी उत्तर दयावे, नाही मागितले असं म्हणून, दिलं का त्यांनी उत्तर? नाही देऊ शकले. कारण पैसे ते मागतात आणि पैसे आम्ही घेतले, असा खोटा प्रचार महाराष्ट्रात करतात.' असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

याउलट मला मंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) माझ्याकडे एकही रुपया सुद्धा मागितला नाही, परंतु त्यांच्याकडून (ठाकरेंकडून) मला मंत्री होण्यासाठी पैसे मागण्यात आले व पैसे देण्यासंदर्भात आपण त्यांना लेखी आश्वासनही दिलं. कारण आम्ही पैसे कुठून आणायचे जेव्हा जमिनी विकल्या जातील, तेव्हा त्याच्यावर आम्ही टॅक्स भरून उरलेले पैसे डोनेशन करतो. मग ते डोनेशन सुद्धा तुम्हाला कमी वाटणार, कारण तुम्हाला रोख पैसे पाहिजेत. आमच्याकडे रोख पैसे नसतात आम्ही फक्त चेकने पैसे देऊ शकतो. कारण आमच्याकडे वाड-वडिलांनी कमावलेल्या जमिनी आहेत आणि या मी जाहीर केलेल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याच्यामुळे यामध्ये कोणी काही लिहिलं तर भान ठेवाव की ही तिसऱ्या पिढीची श्रीमंती आहे. मी सगळं देतो ते चेक ने देतो भले आपल्यावर कर्जाचा बोजा वाढला, तरी चालेल पण योग्य ते करावे. व्यवहार चेकने केले पाहिजेत आणि म्हणून माझ्याकडे कोणी कॅश मागितली आणि त्यांना मी पत्र दिलं असेल तर वाट बघावी. खोके दुसऱ्याला म्हणू नये आपण किती खोके घेतो याचा विचार करावा.' अशी पुन्हा एकदा बोचरी टीका दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी केली आहे.

जनतेने सुद्धा एकदा शहाणे होऊन यांना ओळखले पाहिजे की खरे पैसे यांच्याकडे आहेत. आमच्याकडे काहीच नसताना आमच्याकडे जनतेचे प्रेम आहे. आम्ही लोकांसाठी केलेला उठाव आहे याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही. त्यांच्याकडे काय आहे त्याचे उत्तर त्यांनी द्यावं. मात्र सध्या टोमणे मारणे शिवाय सध्या त्यांना दुसरे काम नाही. असाही टोला उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना दीपक केसरकर यांना लगावला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT