Sunil Tatkare : गितेंना पाडणारा भाजपचा नेता म्हणतोय, यंदाच्या निवडणुकीत रायगडमधून तटकरेंचा कडेलोट करायचाय !

Bjp News : भाजपच्या श्रीवर्धन येथील पदाधिकाऱ्याची टीका
prashant Shinde, Sunil Tatkare
prashant Shinde, Sunil Tatkare Sarkarnama
Published on
Updated on

Raigad News : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाप्रमाणे आता रायगड लोकसभा मतदारसंघातही भाजपने आपला दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यावर महायुतीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनच जोरदार टीका होऊ लागली आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी तटकरे यांना घरचा आहेर दिल्यानंतर आता प्रशांत शिंदे यांनीही आम्ही या निवडणुकीत तटकरे यांचा कडेलोट करणार असल्याचं मोठे विधान केल्याने महायुतीमध्ये रायगड लोकसभेच्या जागेवरून रणकंदन सुरू असल्याचे स्पष्ट झाल आहे. भाजपचे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी ही टीका केली आहे. सध्या भाजपचे रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मेळावे सुरू आहेत. या मेळाव्यांमधून आता तटकरे यांना लक्ष करण्यात आले आहे.

prashant Shinde, Sunil Tatkare
Balasaheb Thackery : स्व. बाळासाहेब ठाकरे....रुद्राक्षमाळा आणि उद्धव ठाकरे!

आजपर्यंत अनंत गिते (Anant Gite) सांगत आले की, या तटकरेंचा कडेलोट आता रायगडवरून करायचा आहे, पण आम्ही गितेंचा कडेलोट गेल्या लोकसभा निवडणुकीत केला. आता धैर्यशील दादाच्या रूपाने तटकरेंचाही कडेलोट करायचा आहे. आता पुढचा खासदार हा हक्काचा भाजपचाच असायला हवा, या निर्धाराने आम्ही या लोकसभा मतदारसंघात उतरलो आहोत.

आम्ही आतापर्यंत सगळ्यांच्या पालख्या उचलल्या, परंतु आता यापुढे आम्हाला ते शक्य नाही. आमचे कमळ हे प्रत्येकाच्या घरात जाणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या गावात जाणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्हाला आमचा हक्काचा खासदार हा धैर्यशील दादाच्या रूपाने पाहिजे आहे, असं मोठं विधान भाजपचे रायगड येथील पदाधिकारी प्रशांत शिंदे यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घरात सगळीच पदे कशाला हवीत

दोन दिवसांपूर्वी भाजपचे अतुल काळसेकर यांनीही तटकरे यांना तुमच्या घरात सगळीच पदे कशाला हवीत, असा खडा सवाल जाहीर सभेत करत घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपकडून विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Takare) यांच्यावरती टीका झाली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

R

prashant Shinde, Sunil Tatkare
Sunil Tatkare : महायुतीचा नेताच खासदार तटकरेंना म्हणाला; 'रायगडमधून बाहेर पडा'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com