Raigad Landslide: रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत जवळपास ६० पेक्षा जास्त जणांना वाचवण्यात यश आले असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियंत्रण कक्षात बसून घटनेवर लक्ष ठेवून होते. तर मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, मदत पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करत गावकऱ्यांना धीर दिला. अजित पवारांनी नियंत्रण कक्षातून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलच झापलं.
अजितदादा प्रांत अधिकाऱ्यांशी बोलत परिस्थितीची माहिती घेत जखमी झालेल्या लोकांची संख्या आणि मृत पावलेल्यांची संख्या लिहून घेत होते. याच वेळी ते मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही बोलत होते. पण मुख्यमंत्री आले म्हणून अधिकारी खाली उतरत असल्याची माहिती त्यांना सांगण्यात आली. यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलच सुनावलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
"गिरीशजी तुम्ही स्पॉटवर पोहोचलात का?, प्रांत देखील स्पॉटवर आहेत. एनडीआरएफचे लोकं आणि तुम्ही घटनास्थळी गेले आहात का? प्रांत वगैरे तुमच्याजवळ आहेत का?", असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. "सीएम आलेत (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) म्हणून खाली जाण्याऐवजी घटनास्थळी अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे ना? कारण जायला एक-दीड तास, पुन्हा वर यायला एक-दीड तास. यामध्येच तीन तास गेले, मग काम कसं होणार?" असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. या संवादाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.