Khalapur Irshalgad Landslide: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा !

Raigad Khalapur Irshalgad Landslide: "घटनेतील जखमींवरील उपचारांचे खर्च राज्य सरकार करणार आहे..'
Irshalwadi Landslide Eknath Shinde
Irshalwadi Landslide Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde at Irshalwadi Accident : पावसाने झोडपून काढल्यामुळे कोकण परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर खालापूर येथील इर्शाळगड या ठिकाणी गंभीर घटना घडली आहे. इर्शाळवाडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi Incident) दरड कोसळली आहे. यात अंदाजे सुमारे शंभर ते दीडशे लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत पाच जणांची मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Irshalwadi Landslide Eknath Shinde
Raigad Khalapur Irshalgad Landslide: मदत-पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणतात, "लष्कर आणि हेलिकॉप्टर रेस्क्यू अॉपरेशन...

दरम्यान या घटनास्थळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहचलेले आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच, या घटनेतील जखमींवरील उपचारांचे खर्च राज्य सरकार करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आतापर्यंत ७५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, जवळपास १०० जण अडकून पडल्याची भीती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मंत्री उदय सामंत, दादा भूसे, अनिल पाटील याठिकाणी पोहचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.

Irshalwadi Landslide Eknath Shinde
Raigad Irshalgad Landslide: ७५ जणांना वाचवण्यात यश, पाच जणांचा मृत्यू; फडणवीसांनी दिली माहिती !

काल रात्री अंधार व पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसून सर्वत्र चिखल झाला आहे. चिखल तुडवून गावापर्यंत बचावकार्यासाठी जावे लागत आहेत. रात्री मदतीसाठी जात असताना अग्निशमनदलाच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.सकाळ होताच वेगाने बचावकार्य सुरू झाले आहे. ४० ते ५० कुटुंब येथे राहत होते. अडीशे जण येथे राहत असल्याची माहिती आहे. खालापूरमधील चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासीवाडी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com