in Devgad BJP secured unopposed victories six candidates in the local Panchayat Samiti elections, marking a significant lead before polling.  Sarkarnama
कोकण

BJP News : भाजप मतदानापूर्वीच सत्तेच्या जवळ : बहुमतासाठी फक्त 2 जागांची गरज; पण, त्यासाठीही विरोधकांचीही टाईट फिल्डिंग

BJP News : देवगडमध्ये पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच भाजपने ६ उमेदवार बिनविरोध निवडून आणत मोठी आघाडी घेतली आहे. सत्ता स्थापनेसाठी आता भाजपला केवळ २ जागांची गरज असून, तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Hrishikesh Nalagune

देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत मतदान होण्याआधीच उमेदवार बिनविरोध करून भाजपने आघाडी घेतली आहे. पंचायत समितीचे ६ उमेदवार बिनविरोध करून भाजप सत्तेच्या समीप गेली आहे. आता पंचायत समितीमध्ये भाजपला सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठण्याकरिता केवळ २ जागांचीच आवश्यकता असून त्यादृष्टीने रणनीती सुरू आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ७ तर पंचायत समितीच्या १४ जागा आहेत. अंतिम दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याने बापर्डे, पडेल, किंजवडे आणि पोंभुर्ले असे एकूण ४ जिल्हा परिषद गट तर पडेल, नाडण, बापर्डे, फणसगांव, शिरगांव आणि कोटकामते असे एकूण ६ पंचायत समिती गण बिनविरोध ठरले आहेत. या सर्व ठिकाणी भाजपची सरशी झाली आहे.

पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी ८ सदस्यांचा बहुमतासाठीचा आकडा आहे. सद्यस्थितीत भाजपने ६ जागा बिनविरोध करून आघाडी घेतली आहे. त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी केवळ २ जागांचीच आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपची त्यादृष्टीने रणनीती सुरू झाली आहे. भाजपचे आणखी २ उमेदवार निवडून आल्यास पंचायत समितीमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता येऊ शकते.

पंचायत समितीच्या पुरळ, तिर्लोट, मणचे, पोंभुर्ले, तळवडे, किंजवडे, मुणगे, कुणकेश्‍वर अशा एकूण ८ जागांवर निवडणूक होणार आहे. ८ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच ठिकाणी दुरंगी लढत आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार, हा औत्सुक्याचा विषय आहे. विरोधकांना पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करायची झाल्यास निवडणूक होणाऱ्या सर्वच जागी त्यांना विजय मिळवावा लागेल.

बहुमताचा आकडा ८ आणि निवडणूक होणाऱ्या ८ जागाच असल्याने भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे झाल्यास विरोधकांना मोठी कंबर कसावी लागेल. मात्र, भाजपला केवळ २ जागांचीच आवश्यकता असल्याने पक्षीय पातळीवर त्यादृष्टीने प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवली जाऊ शकते. भाजप सत्तेच्या समीप असल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता सध्यातरी कमी दिसते.

सभापतीसाठी चुरस शक्य?

भाजप सत्तेच्या जवळ असल्याने सभापतीपद मिळण्याच्या अनुषंगाने पक्षांतर्गत आगावू रणनीती आखली जावू शकते. निवडणूक होत असलेल्या पुरळ, तिर्लोट, मणचे, पोंभुर्ले, तळवडे, किंजवडे, मुणगे, कुणकेश्‍वर या ८ जागांपैकी मणचे आणि कुणकेश्‍वर या २ जागा महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेकडून लढवल्या जात आहेत. त्यामुळे पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता येण्यास वाव असला तरी महायुतीच्या फॉर्मुल्यानुसार कदाचित उपसभापतीपद शिवसेनेकडे जावू शकते. मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना उपसभापती पदापर्यंत पोचण्यासाठी विजय मिळवावा लागेल, असे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT