Dhananjay Munde sarkarnama
कोकण

मंत्रिपद गेलेल्या धनंजय मुंडे यांच्या हालचाली वाढल्या; थेट तटकरेंच्या कार्यक्रमात भर स्टेजवर केली मोठी मागणी; म्हणाले, 'मी रिकामा बसलोय...'

Dhananjay Munde On Sunil Tatkare : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मीक कराड यांचा हात असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Aslam Shanedivan

  1. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

  2. या प्रकरणात मुंडे यांचे सहकारी वाल्मीक कराड यांचं नाव पुढे आलं होतं.

  3. आता रायगडमध्ये मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे “मी रिकामा बसलोय, जबाबदारी द्या” अशी मागणी केली आहे.

Raigad News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मीक कराड कनेक्शन उघड झाल्याने कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्यांची विकेट पडली होती. विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सत्ताधारी भाजपचे नेते आमदार सुरेश धस यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीमुळे त्यांना आपल्या मंत्री पदाचा 4 मार्च 2025 रोजी राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडे पक्षाने कोणतीच जबाबदारी दिलेली नाही. यावरून त्यांनी मी आता रिकामा बसलोय जबाबदारी द्या, अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे मागणी केली आहे. सध्या या मागणीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. ते रायगडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

रायगडच्या कर्जत येथे खा. तटकरे यांच्या नागरी सात्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर नागरीक उपस्थित होते.

या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी तटकरे यांना जबाबदारी द्या अस थेट साकड घातल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. तटकरेंनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. आमचं चुकलं तर नक्कीच कान धरावा आणि नाही चुकलं तर ठिकच, तरीही चालतच, असे म्हणताच एकच हाशा पिकला.

पण आता रिकामं ठेवू नका, जबाबदारी द्या, अशी विनंती करतो, असेही साकडे यावेळी त्यांनी तटकरेंना घातले. मुंडे यांनी अशा पद्धतीने भर सभेत आपल्या भावना बोलून दाखवल्याने तटकरे यांनी डोक्याला हात लावला. सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा आमदार धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी, मुंडे यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल करताना, मुंडे यांची आमदारकी चार महिन्यात जाईल असा दावा केला आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधताना, पंकजा मुंडे यांचेही धनंजय मुंडे प्रमाणेच झालं आहे. त्या आणि धनंजय मुंडे बीडमध्ये जाती-जातीत तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

FAQs :

1. मस्साजोग सरपंच हत्याकांडात कोणाचे नाव आले होते?
धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मीक कराड यांचे.

2. या प्रकरणात धनंजय मुंडेंना काय करावं लागलं?
त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

3. आता मुंडे कोणाकडे जबाबदारीची मागणी करत आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे.

4. मुंडेंनी तटकरे यांना काय सांगितले?
“मी आता रिकामा बसलोय, मला जबाबदारी द्या.”

5. हे प्रकरण कोणत्या जिल्ह्यात घडलं?
रायगड जिल्ह्यात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT