Aaditya Thackeray Sarkarnama
कोकण

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरेंना घेरलं; रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर गंभीर सवाल

CBI FIR triggers fresh political confrontation as Ramdas Kadam questions Aaditya Thackeray : CBI गुन्ह्यानंतर कदमांची प्रतिक्रिया; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, अशी चौकशीची मागणी

Pradeep Pendhare

Ramdas Kadam Questions Aaditya Thackeray : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा सुरुवात झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

रामदास कदम यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत दिशा सालियन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता का, याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली पाहिजे, असा आरोप त्यांनी केला.

दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे सीबीआयने गुन्हा (Crime) दाखल केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात हत्या, सामूहिक अत्याचार, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित गंभीर कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे, असा दावा केला जात आहे.

या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव राजकीय चर्चेत यापूर्वीही आले होते. भाजप नेते नीतेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणाचा अनेकदा उल्लेख केला आहे. आता रामदास कदम यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

ठाकरेंच्या नाईट लाइफवर खळबळजनक दावा

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुरावे नष्ट करण्याचे काम झाले आहे का? याबाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे रात्री बारा वाजता कुठे जायचे आणि पहाटे सहा वाजता परत यायचे, त्यांची नाईट लाइफ कुठे जायची, याचीही चौकशी झाली पाहिजे. यातून अनेक गोष्टी पुढे येतील,” असा दावा रामदास कदम यांनी केला.

रामदास कदमांची तीव्र टीका

यानंतर कदम यांनी ठाकरे कुटुंबावरही तीव्र राजकीय टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांनी कमावलेल्या राजकीय वारशाला काही लोकांनी कलंक लावला, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची योग्य चौकशी झाल्यास अनेक बाबी समोर येतील, असा दावाही कदम यांनी केला. दिशा सालियन प्रकरण मधल्या काळात काही लोकांनी दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे कारवाईला उशीर झाला, असा आरोपही रामदास कदम यांनी केला. मात्र आता सत्य पुढे येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT