Gopichand Padalkar HSRP Number Plate : पडळकरांच्या वाहनावर HSRP नंबर प्लेट नाही; प्रश्न होताच म्हणाले, ‘बनवायला दिली आहे’

Gopichand Padalkar vehicle reportedly lacks an HSRP plate; the BJP MLA says it has been ordered : 30 जूनची मुदत संपून दोन महिने उलटले; नेवासा मोर्चात वाहनाच्या नंबर प्लेटवरून सवाल, नियमांच्या अंमलबजावणीवरही प्रश्न
Gopichand Padalkar HSRP Number Plate
Gopichand Padalkar HSRP Number PlateSarkarnama
Published on
Updated on

HSRP number plate Maharashtra : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनाला एचएसआरपी (High Security Registration Plate) नंबर प्लेट नसल्याने ते राज्यात चर्चेत आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांनी त्यांना जाब विचारला.

यानंतर त्यांना आमदार पडळकर यांच्या समर्थकांकडून शिवीगाळ आणि धमक्यांचे कॉल सुरू झाले. असे असतानाही गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावरील नंबर प्लेट आजही नियमानुसार, कायद्यानुसार नसल्याचे दिसते आहे. यावर लक्ष वेधले असताना, 'मी HSRP नंबर प्लेट बनवायला दिली आहे', अशी प्रतिक्रिया दिली.

नेवासा येथे सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. अजित पवार राष्ट्रवादीचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगातप, संग्रामबापू भंडारे महाराज यांच्यासह भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात गोपीचंद पडळकर यांना, त्यांच्या वाहनावरील क्रमांकावरून मोठ्याप्रमाणात ट्रोलिंग झाले, असे विचारण्यात आले.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी यावर, मी HSRP नंबर प्लेट बनवायला दिली आहे, एवढेच उत्तर दिले. परंतु ही नंबर प्लेट कधी बसवणार? तोपर्यंत आहे त्याच क्रमांकाच्या वाहनातून फिरणार का? नियम अन् कायदा कधी पाळणार? तसेच नियम अन् कायदा न पाळणाऱ्या, अशा वाहनावर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न पडले आहेत.

Gopichand Padalkar HSRP Number Plate
Sangram Bhandare Maharaj : विद्यानंद बापटला सपोर्ट करणाऱ्यांचा 'ढोल' होईल; संग्रामबापू भंडारे यांच्या इशाऱ्याचा अर्थ काय?

जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 होती. वृत्त लिहत असताना, अन् आमदार पडळकरांना माध्यमांनी वाहनाच्या नंबर प्लेटवरून विचारलेला प्रश्न तो आजचा दिवस 6 सप्टेंबर 2026 आहे. या दोन महिन्यात, संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती HSRP नंबर प्लेट वाहनातून फिरत आहे, त्यावर कितीवेळा दंडात्मक कारवाई होणार, हा मोठा प्रश्न देखील चर्चेत आला आहे.

Gopichand Padalkar HSRP Number Plate
Raj Thackeray On PM Modi : ‘मोदींना भेटलं की भगवान भेटल्यासारखं वाटतं? मग भारतात परत या’; राज ठाकरेंचा टोला

दंडात्मक कारवाई 1 जुलैपासून...

महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक असून, या नियमाची कडक अंमलबजावणी व दंडात्मक कारवाई 1 जुलै 2026 पासून सुरू झाली आहे. केंद्राच्या निर्देशानुसार नवीन वाहनांना आधीपासूनच ही प्लेट मिळते.

दंडात्मक कारवाईचा आकडा मोठा

ही नंबर प्लेट नसल्यास पहिल्यांदा 5000 रुपये आणि दुसऱ्यांदा 10000 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. सामान्य नागरिकांना लहान-सहान नियमांसाठी दंड आकारला जातो, वाहने जप्त केली जातात. मात्र, नेत्यांच्या वाहनांना नियमबाह्य नंबर प्लेट असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com