shivsena

 

sarkarnama

कोकण

शिवसेनेत वाद पेटला : माजी नगराध्यक्षाने सर्वांसमक्ष फाडला अर्ज; शहरप्रमुखाची बंडखोरी!

वैभववाडी शिवसेनेत वादाला निवडणुकीतच तोंड फुटले : शहर प्रमुखांची बंडखोरी

सरकारनामा ब्यूरो

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : वैभववाडी नगरपंचायात निवडणुकीत उमेदवार निवडीवरून शिवसेनेत (shivsena) धुसफूस निर्माण झाली आहे. उमेदवारीकरीता इच्छुक असलेल्या एका माजी नगराध्यक्षाने भरलेला अर्ज सर्वासमक्ष फाडला, तर शहरप्रमुख प्रदीप रावराणे यांनी बंडाचे निशाण फडकवित आपल्या चुलत्याचा अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पक्षातर्गंत सुरू असलेल्या वादाला निवडणुकीतच तोंड फुटले आहे. (Dispute in Vaibhavwadi Shiv Sena : Rebellion of citychief)

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या 4 जागांची निवडणुक रद्द झाली होती. ही निवडणुक आता 18 जानेवारीला होणार आहे. नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीन, प्रभाग पाच, प्रभाग पंधरा, प्रभाग सोळा या चार प्रभागांच्या निवडणुका होणार आहेत. प्रभाग तीन आणि प्रभाग पाच हे प्रभाग महिलांसाठी राखीव तर पंधरा आणि सोळा हे प्रभाग खुले आहेत.

शिवसेनेकडून प्रभाग पंधरामधून कुणाला उमेदवारी द्यावी, याबाबत शिवसेना संपर्क कार्यालयात रविवारी (ता. २ जानेवारी) रात्री बैठक झाली. प्रभाग पंधरामधून वैभव सावंत, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण आणि शहरप्रमुख प्रदीप रावराणे यांचे चुलते सुभाष रावराणे हे निवडणुक लढविण्यास इच्छुक होते. या संदर्भात कार्यालयात चर्चा सुरू होती. कुणीही माघार घेण्यास तयार होईना. अखेर पक्षाकडून वैभव सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. हा निर्णय न पटल्यामुळे माजी नगराध्यक्षांनी भरलेला अर्ज फाडल्याची चर्चा कार्यकर्त्यामध्ये आहे. शहरप्रमुख रावराणे यांनी आज बंडाचे निशाण फडकवित आपले चुलते सुभाष रावराणे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले. ऐन निवडणूकीत पक्षातर्गंत बंडागळी निर्माण झाल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मी नाराज नाही : संजय चव्हाण

मी प्रभाग आठमधून निवडणुक लढविली आहे, त्यामुळे प्रभाग पंधरामधून निवडणूक लढविण्यामुळे काही तांत्रिक मुद्दे पक्षाकरीता बाधक ठरले असते. मला पक्षातून कुणाचाही विरोध नव्हता. मी अजिबात नाराज नाही, असे माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT