निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर दरेकरांनी घेतले फडणवीसांचे आशीर्वाद अन्‌ म्हणाले...

मुंबै बॅंकेतील विजयानंतर देवेंद्र फडवीसांनी केले प्रवीण दरेकरांचे अभिनंदन
Devendra Fadnavis-Praveen Darekar

Devendra Fadnavis-Praveen Darekar

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकहाती वर्चस्व मिळविल्यानंतर सहकार पॅनेलचे प्रमुख तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. निवडणुकीतील या यशाबद्दल फडणवीसांनी त्यांचे अभिनंदन केले, तर दरेकर यांनी आपल्या मार्गदर्शनामुळेच हा विजय मिळविणे शक्य झाले, असे सांगितले. (Praveen Darekar meet to Devendra Fadnavis After victory in Mumbai Bank)

प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकर पॅनेलने मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी २१ जागा जिंकल्या आहेत. मुंबै बॅंकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती झाली होती. त्यानंतर बॅंकेच्या २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर झालेल्या चार जागांवरही दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे चौघेही मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यानंतर दरेकर हे फडणवीसांच्या भेटीला गेले होते.

Devendra Fadnavis-Praveen Darekar

शंभूराज देसाईंनी निष्ठावंत कार्यकर्त्याला दिली नववर्षाची अनोखी भेट!

दरेकर यांनी भेटीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या २१ पैकी २१ जागा निवडून आल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. केवळ आपल्या मार्गदर्शनामुळे आणि आमच्यावरील आपल्या विश्वासामुळेच आज हे शक्य झाले.

Devendra Fadnavis-Praveen Darekar

सुभाष देसाईंचे मोठं विधान : मुंबईप्रमाणे इतर शहरांतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी?

दरम्यान, फडणवीसांनीही ह्या भेटीची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज माझ्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली, तेव्हा मुंबई बँकेतील विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Devendra Fadnavis-Praveen Darekar

राष्ट्रवादीच्या आमदाराला राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक

मुंबई बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे ः सहकार पॅनेलचे पुरुषोत्तम दळवी (मध्यवर्ती ग्राहक), विठ्ठल भोसले (प्राथमिक ग्राहक), जयश्री पांचाळ (महिला सहकारी संस्था) आणि अनिल गजरे (भटक्या विमुक्त जातीजमाती) हे विजयी झाले आहेत. अर्बन बँक गटातून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, संदीप घनदाट, गृहनिर्माण सहकारी संस्था गटातून आमदार सुनील राऊत, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, पगारदार पतसंस्था गटातून आमदार प्रसाद लाड, नागरी पतसंस्था गटातून शिवाजीराव नलावडे, महिला गटातून शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, इतर मागासवर्ग गटातून नितीन बनकर, एससी-एसटी गटातून विनोद बोरसे, औद्योगिक गटातून विष्णू घुमरे, सिध्दार्थ कांबळे, इतर सहकारी संस्था गटातून नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, वैयक्तिक गटातून सेनदेव पाटील आणि मजूर संस्था गटातून आनंदराव गोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com