bhaskar jadhav -sadanand chavan
bhaskar jadhav -sadanand chavan Sarkarnama
कोकण

शिवसेनेत वाद पेटला : भास्कर जाधवांचे फार मनावर घेऊ नका : सदानंद चव्हाणांचा टोला

सरकारनामा ब्यूरो

चिपळूण : शिवसेनाप्रमुखांच्या विचारांत किती जोश आणि ऊर्जा आहे, हे तुम्ही आज दाखवून दिले आहे. शेतीची कामे सोडून कोणतीही निवडणूक नसताना तुम्ही सारे एकजुटीने येथे आलात. तुमच्यामधील जोश, उत्साह आणि ऊर्जा हीच शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची ताकद आणि शक्ती आहे. आपल्या मतदारसंघात कोणी आले, काही बोलले तरी त्यांचे फार मनावर घेऊ नका, असे सांगून माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आमदार भास्कर जाधव यांना बेदखल केले. (Don't take MLA Bhaskar Jadhav's speech too seriously: Sadanand Chavan)

माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नाने चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील कोकरे विभागातील गावामध्ये विकासकामे मंजूर झाली असून, त्याचे भूमिपूजन करण्यात आले. डेरवण, दुर्गवाडी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला कुटरे बादेकोंड रस्ता कुशिवडे, असुर्डे मांडकी आदी गावातील विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी गावागावांत भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने सदानंद चव्हाण यांची सावर्डे येथून मिरवणूक काढून स्वागत केले. डेरवण येथे तर ढोल-ताशा आणि फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत शिवसैनिकांच्या गर्दीत दणक्यात स्वागत झाले. या विभागातील डेरवण आणि कुटरे आंग्रेवाडी येथे जाहीर सभा घेण्यात आली. डेरवण येथे नळपाणी योजना भूमिपूजन आणि कुटरे येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरवातही झाली. कित्येक वर्षाची मागणी चव्हाण यांनी पूर्ण केल्याने त्यांचा जाहीर सत्कार केला.

७२ हजार मते घेत ताकद दाखवली

सदानंद चव्हाण म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची ताकद फार मोठी आहे. याच विचाराने शिवसेना आणि शिवसैनिक आज मजबुतीने उभा आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते. मात्र, त्यामध्ये आपण ७२ हजार मते शिवसेनेची आहेत, हे दाखवून दिले. याच मताच्या जोरावर आगामी काळात चिपळूण मतदारसंघात शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवणारच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT