बेपत्ता काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मृतदेह आढळला मोटारीत

त्यांच्या नातेवाईकांनी व मित्र परिवाराने शोधाशोध सुरू केली होती.
Sandesh Bhogle
Sandesh BhogleSarkarnama
Published on
Updated on

बांदा (जि. सिंधुदुर्ग ) : काँग्रेसचे बांदा येथील विभागीय अध्यक्ष आणि माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश बाबली भोगले (वय ५०, रा. बांदा-निमजगा) यांचा मृतदेह त्यांच्या ताब्यातील मोटारीमध्ये आज (ता. २१ ऑक्टोबर) सकाळी आढळला. ते बुधवारी (ता. २० ऑक्टोबर) रात्रीपासून बेपत्ता होते. मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली पोलिस तपासणी नाका परिसरात उभ्या मोटारीमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. (Missing Congress office bearer Sandesh Bhogle's body was found in a car)

याबाबत अधिक माहिती अशी की, भोगले हे बुधवारी (ता. २० ऑक्टोबर) सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. ते उशिरापर्यंत घरी परतले नव्हते. बुधवारी रात्रीपासूनच त्यांच्या नातेवाईकांनी व मित्र परिवाराने शोधाशोध सुरू केली होती. आज सकाळी त्यांच्या ताब्यातील मोटार बांदा चेक पोस्ट परिसरात उभी असलेली आढळली. स्थानिकांनी मोटारीची पाहणी केली असता ते त्यात मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच बांदा ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Sandesh Bhogle
लाल दिव्यासाठी गद्दारी करणाऱ्या राणेंनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी विच्छेदन केले. पोलिस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. भोगले पाच वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते. शहरातील सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मध्यंतरी ते राजकारणापासून अलिप्त होते. त्यांनी वर्षभरापूर्वीच पुन्हा काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता.

Sandesh Bhogle
धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे बोलून दाखवली ही इच्छा!

भोगले हे काँग्रेसचे बांदा विभागीय अध्यक्ष होते. बांदा मराठा समाजाचे ते संस्थापक सदस्य होते. अभ्यासू वृत्तीने त्यांनी प्रभागातील अनेक विकासकामे मार्गी लावली होती. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. बांदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com