Vikas Gogawale Sarkarnama
कोकण

Raigad political dispute : तटकरे बाप-लेकींचे मतदारसंघ हिसकावणार? गोगावलेंच्या मुलाने थेट 2029 चा प्लॅनच सांगितला; रायगडमध्ये शिंदे शिवसेना आक्रमक!

Vikas Gogawale signals Eknath Shinde Shiv Sena 2029 plans for Shrivardhan and Raigad Lok Sabha seats, challenging NCP Sunil and Aditi Tatkare : रायगडच्या राजकारणात शिंदेसेना विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी संघर्ष पेटला; श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे आणि रायगड लोकसभेत सुनील तटकरेंच्या मतदारसंघावर 2029 साठी दावा, विकास गोगावले यांच्या विधानाने राजकीय खळबळ.

Pradeep Pendhare

Vikas Gogawale 2029 election statement : राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगड जिल्ह्यात राजकीय वाद दिवसेंदिवस वाढतच आहे.

अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते चांगलेच टार्गेट करत आहेत. पालकमंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी, 2029च्या निवडणुकीत, तटकरे बाप-लेकीच्या मतदारसंघ रायगड लोकसभा आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघावर दावा करत, राजकीय खळबळ उडवून दिली आहे.

विकास गोगावले यांनी तटकरे बाप-लेकीचे नाव न घेता, 2029च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेची कोणती राजकीय भूमिका असेल, यावर मोठे भाष्य केले. ते म्हणाले, "2029मध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेनेचा उमेदवार असेल. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे जो उमेदवार देतील, तो येथे लढेल. तसेच लोकसभा 2029ला देखील चित्र वेगळे असेल."

विधानसभा 2024 पासून रायगड जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी (NCP) आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत राजकीय वाद सुरू आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे गेले. एकनाथ शिंदे शिवसेनेने यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. यातून महायुतीत चांगलीच धुसफूस सुरू झाली. आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे.

पालकमंत्रीपद मिळल्यापासून रायगडमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरेंच्या राजकीय प्रभावाला वारंवार आव्हान दिले जात आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेने थेट मंत्री अदिती तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीला मोठा राजकीय देत थेट माजी तालुकाध्यक्षाला पक्षात खेचून घेतले आहे.

उद्योजक दर्शन विचारे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे श्रीवर्धनमधील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, तटकरेंकडून काही प्रतिक्रिया येण्याच्या आता, एकनाथ शिंदे शिवसेनेकडून राजकीय हल्ले सुरू झाले आहेत. पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी, शिवसैनिकांना राष्ट्रवादीला राजकीय मैदानात चितपट करण्याचे आवाहन केले. रायगडचा खासदार शिवसेनेचाच, श्रीवर्धनचा आमदार शिवसेनेचाच आणि जिल्ह्यातील सर्व आमदार महायुतीचे झाले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका मांडली.

यानंतर मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी देखील तटकरे बाप-लेकीविरोधात नाव न घेता थेट राजकीय हल्ला चढवला. तटकरे बाप-लेकींच्या मतदारसंघात 2029मधले चित्र वेगळे असेल, असे सांगून, आव्हान निर्माण केले आहे. विकास गोगावले यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीचे संबंध भविष्यात आणखीच ताणले जाणार असल्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT