Aaditya Thackeray Phone Tapping : राहुल गांधींच्या फोन टॅपिंगवर आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट! भाजपच्या मंत्र्यांवरही पाळत; म्हणाले, 'पक्षातच गुप्तचर यंत्रणा'

Aaditya Thackeray backs Rahul Gandhi phone tapping allegations, claiming some BJP ministers are also under surveillance internal intelligence network : विरोधकांसह भाजपमधील काही मंत्र्यांचेही फोन टॅप होत असल्याचा आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप; कोण कुणाला भेटतंय, कोण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे, यावरही नजर असल्याचा दावा.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Narendra Modi Phone Tapping Allegation : पंतप्रधान नरेंद्र मोदी माझा फोन टॅप करतात, असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करत खळबळ उडवून दिली. राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर विरोधक केंद्रातील सत्ताधारी भाजपवर तुटून पडली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार वार केला आहे. 'विरोधकांचे नाही तर, भाजपमध्येही अंतर्गत गुप्तचर यंत्रणांचा वापर होत आहे, कार्यरत आहेत,' असा गंभीर आरोप करत आदित्य ठाकरेंनी खळबळ उडवून दिली.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, “सॅम पित्रोदा सध्या आपल्या देशात आहेत की नाही, याबाबत मला खात्री नाही. ते शेवटचे भारतात कधी आले होते, यालाही किती वर्षे झाली आहेत किंवा त्यांना सध्याच्या परिस्थितीची पूर्ण माहिती आहे की नाही, हे मला माहीत नाही. मात्र, राहुल गांधी जे फोन टॅपिंगप्रकरणात सांगत आहेत ते खरे आहे. विरोधी पक्षातील सर्व नेत्यांचे, तसेच भाजपच्या काही मंत्र्यांचेही फोन टॅप केले जात आहेत."

भाजपमध्येही (BJP) अंतर्गत गुप्तचर यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसते. तुम्ही कुठे जात आहात, कोणाला भेटत आहात, काँग्रेसमध्ये किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याचा विचार करत आहात का? यावर या यंत्रणेमार्फत लक्ष ठेवले जात असल्याचे दिसते, असा खळबळजनक आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. हीच गुप्तचर यंत्रणा देशविरोधी कारवाया किंवा दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरली असती, तर त्याचा देशाला अधिक फायदा झाला असता, असाही टोला आदित्य यांनी सत्ताधारी भाजपला लगावला.

Aaditya Thackeray
Ajit Pawar NCP MLAs : शरद पवारांच्या संपर्कात अजितदादांचे 22 ते 26 आमदार? फडणवीस अलर्ट; महायुतीत मोठी खळबळ!

शिवसेनेचे मुख्य नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, राहुल गांधी यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना, केंद्र सरकारवर हे आरोप राजकीय हेतून प्रेरित असल्याचे म्हणत भाजपची बाजू घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन सिन्हा, नेते राजीव चंद्रशेखर यांनी काँग्रेस नेत्यांच्या दाव्यांवर आक्षेप घेतला असून, विरोधकांकडून वारंवार चुकीची माहिती आणि विधाने पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे.

Aaditya Thackeray
Morshi Municipal Council Mutton Party : एकनाथ शिंदे शिवसेना सत्ताधीश असलेल्या मोर्शी नगरपरिषदेच्या छतावर रंगली 'मटण पार्टी'; नगराध्यक्षांची सावरासावर, जिल्हाधिकाऱ्यांची शिस्तभंगाची नोटीस

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेसाठी वारंवार चॅलेंज देत आहेत. मोदी मला देशविरोधी म्हणत असतात. पण चर्चेदरम्यान मी देशाला दाखवून देईल की नक्की देशविरोधी कोण आहे. कोण कोणाच्या इशाऱ्याने आणि कधीपासून काम करतो आहे. मला सत्य माहीत आहे, हे त्यांनाही माहिती आहे. या चर्चेनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान पदावर राहू शकत नाही, असाही विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.