अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
ममता बॅनर्जी व संजय राऊत यांच्यानंतर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही चौकशीची मागणी केली आहे.
या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी टीका केल्याने राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे.
Ratnagiri News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता.२८) सकाळी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. धावपट्टी अवघ्या १०० मीटरवर असताना ते थेट खाली कोसळ्याने हा अपघात झाला. ज्यात अजितदादांसह पाच जणांना मृत्यू झाला. या घटनेनं अख्ख्या राज्यावर शोककळा पसरली आहे. यादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी होती.
तशीच मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. ज्यानंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अक्षेप घेत जोरदार टीका केली होती. यानंतर मागणीचे प्रकरण शांत होईल असे वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी देखील मागणी करत वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी, अजित पवार यांच्या झालेल्या विमान अपघाताची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी, असे म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी, "अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने मला प्रचंड धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला, ही बातमी ऐकून खूप दुःख झाले. हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे." "मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह संपूर्ण कुटुंब आणि अजितदादांच्या समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. मात्र, ही घटना कशी घडली याची योग्य आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे," अशी मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या अपघाताला जबाबदार कोण? असा सवाल केला. तसेच या अपघाताची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. ज्यानंतर राज्यात वाद सुरू झाला होता. यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत भावुक अंतःकरणाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी, महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे हे मोठे नुकसान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा निव्वळ एक अपघात असून यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी स्वतः पुढे येऊन तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींसह राऊत यांनी विमान अपघातानंतर उपस्थितीत केलेल्या अपघात आहे की घातपात संशयाला पूर्ण विराम दिला होता.
ज्यानंतर हा विषय येथेच थांबला होता. पण शिंदेंचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी यावर भाष्य करत नवा वाद निर्माण केला आहे. शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर असताना विमान अपघातात मृत्युमुखी पडणे ही अत्यंत धक्कादायक घटना असल्याचे म्हटले. तसेच या अपघातामागील नेमकी कारणे काय आहेत. या अपघातामागील नेमकं सत्य जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी केली.
ते म्हणाले, सकाळी ८ ते ८.३० वाजता विमान उतरत असताना वैमानिकाला नक्की कोणत्या अडचणी आल्या हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे अपघाताच्या मागील कारणांची अधिक स्पष्ट होणे गरजेचे आहे. अन्यथा नेत्यांचा विमान प्रवास हा असुरक्षिततेचे साधन ठरेल, असाही दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान अपघाताच्या आज (ता.३१) चौथ्या दिवशी अजित पवार यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक व वक्फ ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली आहेत. पण अर्थ खाते सध्या तरी फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांच्याकडे आले असतानाच दुसरीकडे अपघाताच्या चौकशीबाबत विविध स्तरातून मागण्या होत आहेत.
Q1. रामदास कदम यांनी नेमकी काय मागणी केली आहे?
👉 अजित पवार यांच्या विमान अपघाताची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
Q2. यापूर्वी कोणत्या नेत्यांनी चौकशीची मागणी केली होती?
👉 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि खासदार संजय राऊत यांनी चौकशीची मागणी केली होती.
Q3. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय होती?
👉 त्यांनी या मागणीवर आक्षेप घेत जोरदार टीका केली होती.
Q4. रामदास कदम कोणत्या पक्षाचे नेते आहेत?
👉 रामदास कदम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे नेते व माजी मंत्री आहेत.
Q5. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
👉 चौकशीच्या मागणीमुळे राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.